Attack On Imtiyaz Jaleel : एकीकडे महापालिका निवडणुकीची धामधूम सुरू असताना छत्रपती संभाजीनगर मध्ये हादरवणारा प्रकार समोर आला आहे. एम आय एम चे नेते इम्तियाज जलील यांच्या गाडीवर पक्षातीलच काही असंतुष्ट कार्यकर्त्यांकडून हल्ला करण्यात आला. या कार्यकर्त्यांनी जलील यांच्या गाडीतील लोकांना बुक्क्या मारल्याचाही व्हिडिओ समोर आलाय. या एकूण प्रकरणामुळे एमआयएम मध्ये मोठे खळबळ उडाली आहे.
जलील यांची प्रतिक्रिया काय
या संपूर्ण प्रकारावर प्रतिक्रिया देताना इम्तियाज जलील म्हणाले की, राजकारणात असे प्रकार होत असतात. मला त्यांच्या बाबतीत काही बोलायचं नाही. लोकशाहीने मला कुठही जाण्याचा आणि पदयात्रा करण्याचा अधिकार दिलेला आहे, मी ते करत आहे. आता कुणाला आम्ही इकडे येऊ नये याबाबत आक्षेप असेल, मात्र आमचा उमेदवार आहे त्यामुळे आम्ही प्रचार करत आहोत. आता 16 तारखेला जेव्हा निकाल येईल तेव्हा तुम्हाला कळेल की काळ्या झेंड्यांचा अर्थ काय आहे आणि हिरव्या झेंड्याचा अर्थ काय आहे.
नेमकं काय घडलं (Attack On Imtiyaz Jaleel)
जलील यांच्यावर हल्ला करण्याचा प्रकार छत्रपती संभाजीनगरमधील घडला. प्रचार रॅलीच्या दरम्यान ही घटना घडली. सुरुवातीला जलील यांच्या यांच्या गाडीला काळे झेंडे दाखवण्यात आले होते. त्यानंतर त्यांच्या वाहनावर हल्ला झाला आहे. इम्तियाज जलील पुढच्या सीटवर बसले होते. या घटनेत एमआयएमचा एक कार्यकर्ता जखमी आहे. इतर जे कार्यकर्ते आहेत, त्या बाबत चौकशी सुरु आहे. जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांना सौम्य लाठीचार्ज देखील करावा लागला. त्यामुळे या भागात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. कलीम कुरेशी नावाचे एक उमेदवार काँग्रेसकडून उभे आहेत, त्यांनी हा सगळा प्रकार केल्याचा आरोप इम्तियाज जलील यांच्याकडून करण्यात आला





