पद्म भूषण पुरस्कार मिळताच कोश्यारींची पहिली प्रतिक्रिया समोर, म्हणाले जनतेच्या प्रेमामुळेच….

Published:
पद्म भूषण पुरस्काराने गौरवण्यात आल्यानंतर भगतसिंह कोशारी यांनी भारताच्या राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मू, पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह, केंद्र सरकार आणि निवड समितीचे मनःपूर्वक आभार मानले
पद्म भूषण पुरस्कार मिळताच कोश्यारींची पहिली प्रतिक्रिया समोर, म्हणाले जनतेच्या प्रेमामुळेच….

महाराष्ट्राचे माजी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना केंद्र सरकारने पद्म भूषण पुरस्काराने गौरवले. या निर्णयावरून राज्यातील राजकीय वातावरण तापले असून, विरोधकांनी जोरदार टीका केली आहे. भगतसिंग कोश्यारी यांना अशा कोणत्या कारणाने हा पुरस्कार देण्यात आला? असा सवाल करत शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी तोफ डागली तर महायुतीतील नेत्यांकडून कोश्यारीना मिळालेल्या पुरस्काराबद्दल कौतुक केले जात आहे.  अशातच आता खुद्द भगतसिंह कोशारी यांनी पुरस्काराबद्दल प्रतिक्रिया दिली आहे.

काय म्हणाले कोश्यारी?

पद्म भूषण पुरस्काराने गौरवण्यात आल्यानंतर भगतसिंह कोशारी यांनी भारताच्या राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मू, पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह, केंद्र सरकार आणि निवड समितीचे मनःपूर्वक आभार मानले. जनतेच्या प्रेमामुळेच मी विधान परिषद सदस्य, आमदार, खासदार, मुख्यमंत्री आणि राज्यपाल झालो. हा सन्मानही त्यांच्या आशीर्वादाचा परिणाम आहे. मी आता अधिक उत्साहाने देश आणि समाजासाठी काम करेन. या पुरस्काराने मला नवीन ऊर्जा मिळाली असून, निष्ठेने सेवा सुरू ठेवेन असे कोश्यारी यांनी म्हटले.

देवेंद्र फडणवीस यांच्याकडून कौतुक

दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भगतसिंह कोश्यारी यांना मिळालेल्या पद्म भूषण पुरस्काराचे स्वागत केले आहे. भगतसिंह कोश्यारी  यांचे जीवन प्रगल्भ आहे. त्यांचे मोठे कार्य म्हणजे वन रँक वन पेन्शन आहे. पहाडी भागात कोश्यारी यांनी मोठ काम केलं आहे. टीका करणारे छोट्या मनाचे लोक असल्याने ते विरोध करत आहेत. कोणाच्या काळात कोणाला आणि कसे गौरविले, हे आता बोलणे योग्य नाही,” असा टोला फडणवीसांनी लगावला.