विदर्भात मोठी राजकीय घडामोड, काँग्रेस खासदार प्रतिभा धानोरकरांचे दीर अनिल धानोरकरांचा भाजपात प्रवेश

Written by:Rohit Shinde
Published:
महाविकास आघाडीला धक्का देत काँग्रेस खासदाराच्या दीराने भाजपात प्रवेश केला आहे. काँग्रेस खासदार प्रतिभा धानोरकर यांचे दीर अनिल धानोरकर यांनी ठाकरेंना जय महाराष्ट्र करत भाजपचे कमळ हाती घेतले.
विदर्भात मोठी राजकीय घडामोड, काँग्रेस खासदार प्रतिभा धानोरकरांचे दीर अनिल धानोरकरांचा भाजपात प्रवेश

विदर्भाच्या राजकारणातून मोठी राजकीय घडामोड समोर येत आहे. खरंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपाच्या नेत्यांच्या खेळीला यश येताना दिसत आहे. राज्यात आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपमध्ये जोरदार पक्षप्रवेश सुरू आहेत. नव्याने प्रदेशाध्यक्ष झालेले रविंद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत अनेक ठिकाणी पक्षप्रवेश होत आहेत. त्यामध्ये आता विदर्भातील काँग्रेसच्या खासदार प्रतिभा धानोरकरांचे दीर अनिल धानोरकरांना थेट भाजपामध्ये प्रवेश केला आहे. त्यामुळे काँग्रेस आणि पर्यायाने उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला यामुळे मोठा धक्का बसला आहे.

अनिल धानोरकरांचा भाजपात प्रवेश

महाविकास आघाडीला धक्का देत काँग्रेस खासदाराच्या दीराचा भाजपात प्रवेश केला आहे. काँग्रेस खासदार प्रतिभा यांचे दीर अनिल धानोरकर यांनी ठाकरेंना जय महाराष्ट्र करत भाजपचे कमळ हाती घेतले.  प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि माजी केंद्रीय मंत्री हंसराज अहिरांच्या उपस्थितीत आपल्या कार्यकर्त्यांसह त्यांनी भाजपामध्ये प्रवेश केला. विशेष म्हणजे अनिल धानोकर यांनी तिसऱ्यांना पक्ष बदलला आहे. यावेळी त्यांनी ठाकरेंच्या शिवसेनेला सोडचिठ्ठी दिली आहे.

विदर्भात भाजपाची मोठी खेळी

प्रतिभा धानोरकर यांचे दीर आणि दिवंगत खासदार बाळू धानोरकर यांचे सख्खे मोठे बंधू अनिल धानोरकर यांनी आज भाजपात प्रवेश केला. मुंबई येथे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते अनिल धानोरकर यांचा पक्षप्रवेश झाला. यावेळी, शिवसेना उद्धव ठाकरेंच्या पक्षातील 10 नगरसेवकांनी देखील भाजपात प्रवेश केला. मुंबईतील भाजपच्या कार्यालयात हा पक्षप्रवेश सोहळा संपन्न झाला. धानोकर यांनी यापूर्वी काँग्रेस, वंचित बहुजन आघाडी आणि ठाकरेंच्या शिवसेना पक्षात काम केले आहे. आता, ते भाजपचे कमळ हाती घेत आहेत.  यामुळे भाजपाच्या विदर्भातील राजकारणाला यामुळे मोठी मजबूती येणार आहे.

अनिल धानोरकर भद्रावती नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष असून दोन वर्ष त्यांच्याकडे ठाकरेंच्या शिवसेना जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी होती. गेल्या अनेक वर्षांपासून त्यांच्या नेतृत्वात धानोरकर कुटुंबीयांची भद्रावती नगरपरिषदेवर एकहाती सत्ता आहे. विधानसभा निवडणुकीत अनिल धानोरकर यांना वरोरा विधानसभा क्षेत्रातून काँग्रेसने तिकीट नाकारले होते. त्यानंतर अनिल धानोरकर यांनी प्रतिभा धानोरकर यांच्याबद्दल जाहीर नाराजी दाखवली आणि वंचितच्या तिकीटावर विधानसभा निवडणूक लढवली होती. त्यानंतर आता अनिल धानोरकरांनी थेट भाजपामध्ये प्रवेश केला आहे.