EVM वर NCP च्या उमेदवाराचं नावच बदललं, शेखरच झालं शेख, काय आहे नेमकं प्रकरण?

Published:
कल्याण-डोंबिवलीमध्ये मतदान यादीत एक उमेदवाराचं नाव बदलल्याने चांगलाच गोंधळ निर्माण झाला आहे.
EVM वर NCP च्या उमेदवाराचं नावच बदललं, शेखरच झालं शेख, काय आहे नेमकं प्रकरण?

Mumbai Municipal Corporation election:   महाराष्ट्रातील तब्बल २९ महानगरपालिकांसाठी आज मतदान होत आहे. गेल्या अनेक दिवसांपासून या निवडणुकांची रणधुमाळी सुरु आहे. गेल्या अनेक दिवसांपासून प्रत्येक पक्षांची एकमेकांवर टीकाटिपण्णी सुरूच आहे. विरोधी पक्षनेते निवडणूक आयोगावरसुद्धा अनेक प्रश्न उपस्थित करत आहेत. निवडणूक आयोगाने यंदाच्या निवडणुकीत घेतलेल्या अनेक निर्णयांनी सर्वांच्या भुवय्या उंचावल्या मतदान केंद्रावर आणखी एक खळबळजनक प्रकार समोर आला आहे.

नेमकं काय घडलं?
कल्याण-डोंबिवलीमध्ये मतदान यादीत एक उमेदवाराचं नाव बदलल्याने चांगलाच गोंधळ निर्माण झाला आहे. कल्याण-डोंबिवलीतील टिटवाळा या भागातील क्रमांक ३ प्रभागातील एका उमेदवाराचे ईव्हीएम मशीनवरील आणि बाहेरील मतदान यादीतील नाव बदलल्याने नागरिक संभ्रमात असल्याचा आरोप उमेदवाराने केला आहे.

शेखरचं झालं शेख-
टिटवाळ्यातील प्रभाग क्रमांक ३ मधील शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार शेखर वाकोडे यांचं नाव बदलल्याचा आरोप त्यांनी केला आहे. यामध्ये आपल्या नावात शेखर ऐवजी शेख वाकोडे झाल्याने थेट जात बदलल्याचा प्रकार घडला आहे. आपले नाव बदलल्याने आपले कार्यकर्ते संभ्रमात असून आपल्याला फोन येत असल्याचे त्यांनी स्पष्ट केलं आहे.

याबाबत बोलताना शेखर वाकोडे म्हणाले, मी गेल्या ५ वर्षांपासून या प्रभागात फिरून चांगला जनसंपर्क निर्माण करत कष्ट घेतले आहेत. पण आज मतदान केंद्रावर माझे नाव बदलल्याने लोक मला तुमचे नाव यादीत का नसल्याचे विचारत आहेत. यामुळे त्यांच्यात संभ्रम निर्माण झाला आहे.

(टीप : वरील सर्व माहिती उपलब्ध स्त्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल MP मराठी Breaking कोणताही दावा करीत नाही.)

Aiman Jahangir Desai
लेखकाबद्दल
ऐमन जहागीर देसाई गेली 7 वर्षे पत्रकारितेत आहे. अडीच वर्षे न्यूज 18 लोकमत त्यानंतर दीड वर्षे हिंदुस्थान टाइम्स डिजिटलमध्ये काम केलं आहे. तिला मनोरंजन, लाइफस्टाइल, अध्यात्म या विषयांमध्ये रुची आहे. या विषयांच्या बातम्या करण्यात ती अधिक रमते. View all posts by Aiman Jahangir Desai
Follow Us :GoogleNews