Snake at Chembur Polling Booth: महाराष्ट्रभर आज सकाळी ७ वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली आहे. तब्बल २९ महानगरपालिकांचा हा रणसंग्राम सुरु आहे. नागरिक आपल्या कर्तव्याची जाणीव ठेऊन मतदानाला गर्दी करत आहेत. प्रत्येक मतदान केंद्रावर मोठ्या प्रमाणात गर्दी पाहायला मिळत आहे. परंतु मुंबईतील चेंबूरच्या मतदान केंद्रात एक आश्चर्यकारक घटना दिसून आली. या घटनेची आता सोशल मीडियावर मोठी चर्चा होत आहे.
सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ जोरदार व्हायरल होत आहे. माहितीनुसार हा व्हिडीओ चेंबूर भागातील मतदान केंद्रावरील आहे. या मतदान केंद्रात चक्क विषारी घोणस आढळून आला आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांची एकच खळबळ उडाली होती.
चेंबूर केंद्रात नेमकं काय घडलं?
व्हायरल व्हिडीओ चेंबूरमधील लॉरेन्ट कॉन्व्हेंट स्कुलमधील आहे. या मतदान केंद्रात चक्क विषारी घोणस सापडला. माहितीप्रमाणे या मतदान केंद्रात मतदानासाठी आदल्या दिवशी रात्री आणि आज पहाटे सर्व आवश्यक कार्ये केली जात होती. मतदान केंद्र सुसज्ज करत असताना एका कोपऱ्यात तब्बल ४ फुटाचा घोणस साप दिसून आला.
या मतदान केंद्रामध्ये आढळेल साप अतिशय विषारी आणि मोठा असल्याने कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं होत. दरम्यान अग्निशामक दल आणि सर्पमित्रांच्या मदतीने हे साप सुरक्षितरित्या रेस्क्यू करून नेण्यात आलं.
View this post on Instagram
मतदानापूर्वीच हा प्रकार घडल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. परंतु कर्मचाऱ्यांच्या सावधगिरीने आणि सर्पमित्रांच्या धाडसाने गंभीर घटना टाळली. त्यानंतर मतदान केंद्राची योग्य तपासणी करून नंतर मतदानाला सुरुवात करण्यात आली.
(टीप : वरील सर्व माहिती उपलब्ध स्त्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल MP मराठी Breaking कोणताही दावा करीत नाही.)






