BMC Election 2026 : अखेर शिंदेंनी डाव टाकलाच!! BMC मध्ये महापौर पदावर दावा??

Published:
यंदाचे वर्ष बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दीचे वर्ष आहे. त्यामुळे बाळासाहेबांची ही इच्छा पूर्ण करा आणि शिवसेनेला अडीच वर्ष महापौरपद द्या, अशी भावनिक साद एकनाथ शिंदे भाजपकडे करण्याची चर्चा सुरू झाली आहे.
BMC Election 2026 : अखेर शिंदेंनी डाव टाकलाच!! BMC मध्ये महापौर पदावर दावा??

BMC Election 2026 : मुंबई महापालिका निवडणुकीच्या निकालाला दोन दिवस झाले असले तरी महापौर नेमका होणार तरी कोणाचा हा प्रश्न अजूनही कायम आहे. या मागचं कारण आहे आकड्यातील गणित…. भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्या महायुतीला 118 जागा मिळाल्या असल्या तरी एकनाथ शिंदे यांच्या मदतीशिवाय भाजपला मुंबईत आपला महापौर बसवता येत नाही. हीच भाजपची गरज ओळखून एकनाथ शिंदे यांनी अखेरच्या क्षणात मोठा डाव टाकला आहे.

तेव्हाच शंकेची पाल चुकचुकली (BMC Election 2026)

एकनाथ शिंदे यांनी आपल्या सर्व विजयी 29 नगरसेवकांना मुंबईतील वांद्रे येथील ताज लँडस एंड हॉटेल मध्ये ठेवलं आहे. मुंबई महापालिकेत सत्ता स्थापन होईपर्यंत, शिवसेनेच्या नवनिर्वाचित 29 नगरसेवकांना वांद्रे येथील ताज लँड्स एन्ड या पंचतारांकित हॉटेलमध्ये ठेवण्यात येणार आहे. एकनाथ शिंदे यांनी नगरसेवकांना हॉटेलमध्ये बोलावून घेतले तेव्हाच अनेकांच्या मनात शंकेची पाल चुकचुकली होती. आता नगरसेवकांना हॉटेलमध्ये ठेवल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी भाजप समोर महापौर पदाची अड घातल्याची चर्चा सुरू झाली आहे. BMC Election 2026

बाळासाहेब ठाकरेंच्या नावाखाली भावनिक साद

सूत्रांच्या माहितीनुसार एकनाथ शिंदे यांनी पहिल्या अडीच वर्षासाठी भाजपकडे मुंबई महापालिकेचे महापौर पद मागणार असल्याचे बोलले जात आहे.  यंदाचे वर्ष बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दीचे वर्ष आहे. त्यामुळे बाळासाहेबांची ही इच्छा पूर्ण करा आणि शिवसेनेला अडीच वर्ष महापौरपद द्या, अशी भावनिक साद एकनाथ शिंदे भाजपकडे करण्याची चर्चा सुरू झाली आहे. मात्र कोणत्याही परिस्थितीत भाजप एकनाथ शिंदे यांची ही मागणी पूर्ण करण्याची शक्यता नाही. कारण मागील अनेक वर्षांपासून मुंबई महापालिकेत आपलाच महापौर बसवायचा यासाठी भाजपने चंग बांधला होता. त्यासाठीची तयारी केली होती आणि भाजपाला सर्वाधिक नगरसेवक सुद्धा निवडून आणण्यात यश मिळाले. अशावेळी शिंदेंचा महापौर मुंबईत बसवला तर भाजप ही निवडणूक हरल्यासारखं होईल.

Asavari Khedekar Burumbadkar
लेखकाबद्दल
आसावरी ओंकार बुरुंबाडकर गेली 4 वर्ष पत्रकारितेत काम करत आहे. सध्या MP मराठी Breaking मध्ये डिजिटल कंटेट रायटर म्हणून कार्यरत आहे. आसावरीला मनोरंजन, अध्यात्म, लाईफस्टाईल अशा विविध विषयांमध्ये रुची आहे. यापूर्वी तिने एबीपी माझा, रत्नागिरी टाईम्स या मीडिया हाऊसमध्ये काम केलं आहे. डिजिटल माध्यमात काम करताना वृत्तपत्रांमध्ये विविध विषयावर लिखाण केलं आहे. डिजिटलमध्ये काम करताना ती वाचनाची आणि लिखाणाचीही आवड जपते. View all posts by Asavari Khedekar Burumbadkar
Follow Us :GoogleNews