Marathi News

BMC Election 2026 : मराठी माणसाच्या भल्यासाठी मुंबईत ठाकरेच हवेत; राजू शेट्टींचा जाहीर पाठिंबा

Published:
आमचे वैचारिक मतभेद असले तरीही मुंबईत मराठी माणसाच्या भल्यासाठी ठाकरे बंधूच विजयी व्हावेत असं राजू शेट्टी म्हणाले.
BMC Election 2026 : मराठी माणसाच्या भल्यासाठी मुंबईत ठाकरेच हवेत; राजू शेट्टींचा जाहीर पाठिंबा

BMC Election 2026 : मुंबई महापालिका निवडणूक अतिशय रंगतदार अवस्थेत आहे. एकीकडे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे तर दुसरीकडे शिंदे आणि फडणवीस यांची महायुती असा थेट सामना मुंबईत बघायला मिळतोय. दुसरीकडे मुंबईतील ही लढत मराठी विरुद्ध मराठी अशा अँगलने सुद्धा बघितली जाते. याचं कारण म्हणजे ठाकरे बंधू हे मराठीच्या मुद्द्यावर एकत्र आलेत. ठाकरे बंधूंच्या आत्तापर्यंतच्या प्रचारात मराठी मुंबई आणि महाराष्ट्र हाच अजेंडा दिसतोय. मुंबई म्हटलं की ठाकरे पाहिजे अस मी लहानपणापासून ऐकतोय असं म्हणत मराठा आंदोलन मनोज जरांगे पाटील यांनी यापूर्वीच ठाकरे बंधूंना पाठिंबा दिलाय. आता आणखी एका नेत्याने मराठीच्या मुद्द्यावरूनच ठाकरे बंधूंना पाठिंबा दिला आहे.

कोणी दिला ठाकरेंना पाठिंबा

मराठी माणसाच्या भल्यासाठी मुंबईत ठाकरेच हवेत असे विधान शेतकरी नेते आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी केलं आहे. आमचे वैचारिक मतभेद असले तरीही मुंबईत मराठी माणसाच्या भल्यासाठी ठाकरे बंधूच विजयी व्हावेत असं राजू शेट्टी म्हणाले. आज राजू शेट्टी यांनी शक्तिपीठ महामार्गाला विरोध दर्शवण्यासाठी धाराशिव सोलापूर सीमावर्ती भागात शेतकऱ्यांचं अधिवेशन घेतलं. यावेळी त्यांनी मुंबई महापालिका निवडणुकीबद्दल मत व्यक्त केले. BMC Election 2026

भाजपवर टीका

एकीकडे ठाकरे बंधूंना जाहीर पाठिंबा देताना दुसरीकडे राजू शेट्टी यांनी भाजपवर मात्र टीकेची तोफ लागली आहे . मुंबईवर, मराठी माणसावर प्रेम आहे, त्यांच्या विकासासाठी आपण प्रयत्न करतोय असा दावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस करत असले तरी महाराष्ट्राच्या हक्काचे प्रकल्प गुजरातला किती पाठवले त्याची माहिती घ्या म्हणजे त्यावरून मराठीवर मुख्यमंत्र्यांचे प्रेम दिसून येईल असा टोलाही राजू शेट्टी यांनी लगावला.

Asavari Khedekar Burumbadkar
लेखकाबद्दल
आसावरी ओंकार बुरुंबाडकर गेली 4 वर्ष पत्रकारितेत काम करत आहे. सध्या MP मराठी Breaking मध्ये डिजिटल कंटेट रायटर म्हणून कार्यरत आहे. आसावरीला मनोरंजन, अध्यात्म, लाईफस्टाईल अशा विविध विषयांमध्ये रुची आहे. यापूर्वी तिने एबीपी माझा, रत्नागिरी टाईम्स या मीडिया हाऊसमध्ये काम केलं आहे. डिजिटल माध्यमात काम करताना वृत्तपत्रांमध्ये विविध विषयावर लिखाण केलं आहे. डिजिटलमध्ये काम करताना ती वाचनाची आणि लिखाणाचीही आवड जपते. View all posts by Asavari Khedekar Burumbadkar
Follow Us :GoogleNews