BMC Election 2026 : शिंदेंचे नगरसेवक थेट उद्धव ठाकरेंच्या संपर्कात; मुंबईत डाव पलटणार

Published:
उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्या बद्दल आमच्या मनात काही नाही. आम्ही आजही उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांना मानतो असे या नगरसेवकांनी म्हटलं
BMC Election 2026 : शिंदेंचे नगरसेवक थेट उद्धव ठाकरेंच्या संपर्कात; मुंबईत डाव पलटणार

BMC Election 2026 : मुंबईतून एक मोठी राजकीय बातमी समोर येत आहे. मुंबईचा महापौर कोण होणार यावर अजूनही राजकीय तर वितर्क लढवले जात आहेत. एकनाथ शिंदे यांनी आपले 29 नगरसेवक मुंबईतील हॉटेल ताजलँड मध्ये मुक्कामी ठेवल्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. त्यातच आज सकाळी शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत आणि विधान केलं होतं की आज आम्ही हॉटेल ताज लँड्स मध्ये जेवायला जाणार आहोत. त्यामुळे शिंदे गटाचे खासदार फुटणार का या चर्चांना वेग आला. आता एकनाथ शिंदे यांचा टेन्शन वाढवणारी आणखीन एक बातमी समोर येतेय.

शिंदे यांचे आमदार ठाकरेंच्या संपर्कात (BMC Election 2026)

एकनाथ शिंदे यांनी आपले 29 नगरसेवक हॉटेल ताज लेंस मध्ये ठेवले आहेत. मात्र यातील एका नगरसेवकाने उद्धव ठाकरे यांच्या अतिशय जवळच्या व्यक्तीला कॉल केल्याची बातमी द न्यू इंडियन एक्सप्रेस या वृत्तपत्राने दिले आहे. उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्या बद्दल आमच्या मनात काही नाही. आम्ही आजही उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांना मानतो असे या नगरसेवकांनी म्हटलं असल्याची बातमी समोर येत आहे. या बातमीमुळे शिंदे गटाला मोठा धक्का बसण्याची शक्यता वर्तवण्यात येते. BMC Election 2026

शिंदेंनी नगरसेवकांना हॉटेल मध्ये का ठेवले

दरम्यान, आम्ही महायुती म्हणून लढलो आणि जिंकलो आहोत, पाठीत खंजीर खुपसण्याची आमची भूमिका नाही. महायुती म्हणूनच सत्तेत येणार आहोत. आमचे जवळपास 20 नगरसेवक हे नवखे आहेत, त्यांना मनपाचं कामकाज माहीत नाही. त्यामुळे, त्याच संदर्भाने आम्ही नगरसेवकांसाठी दोन दिवसीय शिबिर घेतलं आहे, त्यासाठी हे नगरसेवक हॉटेलमध्ये आहेत अशी माहिती शिंदे गटाच्या प्रवक्त्या शितल म्हात्रे यांनी दिली.

Asavari Khedekar Burumbadkar
लेखकाबद्दल
आसावरी ओंकार बुरुंबाडकर गेली 4 वर्ष पत्रकारितेत काम करत आहे. सध्या MP मराठी Breaking मध्ये डिजिटल कंटेट रायटर म्हणून कार्यरत आहे. आसावरीला मनोरंजन, अध्यात्म, लाईफस्टाईल अशा विविध विषयांमध्ये रुची आहे. यापूर्वी तिने एबीपी माझा, रत्नागिरी टाईम्स या मीडिया हाऊसमध्ये काम केलं आहे. डिजिटल माध्यमात काम करताना वृत्तपत्रांमध्ये विविध विषयावर लिखाण केलं आहे. डिजिटलमध्ये काम करताना ती वाचनाची आणि लिखाणाचीही आवड जपते. View all posts by Asavari Khedekar Burumbadkar
Follow Us :GoogleNews