BMC Election Result : ठाकरेंच्या हातून मुंबई निसटली; भाजप सर्वात मोठा पक्ष

Published:
ठाकरेंची 25 वर्षांची सत्ता इतिहास जमा झाली आहे. भाजप आणि शिंदे गटाने मुंबई महापालिकेत आपले उद्धव ठाकरे यांना असमान दाखवला आहे
BMC Election Result : ठाकरेंच्या हातून मुंबई निसटली; भाजप सर्वात मोठा पक्ष

BMC Election Result : मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या निकालात उद्धव ठाकरेंना मोठा धक्का बसला आहे. ठाकरेंची 25 वर्षांची सत्ता इतिहास जमा झाली आहे. भाजप आणि शिंदे गटाने मुंबई महापालिकेत आपले उद्धव ठाकरे यांना असमान दाखवला आहे. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र असूनही ठाकरे बंधूंना मुंबई महापालिकेतील आपली सत्ता राखता आली नाही. मुंबईकरांनी भाजपच्या विकासाच्या राजकारणाला मतदान दिले.

मुंबईत आत्तापर्यंत कोणाला किती जागा (BMC Election Result)

आतापर्यंत हाती आलेल्या कलानुसार, मुंबईत भाजप 99, एकनाथ शिंदे यांचे शिवसेना 31, ठाकरे गटाला 63, मनसेला 9, काँग्रेस आणि वंचित आघाडीचे 14, आणि इतर नऊ उमेदवार आघाडीवर आहेत. मराठीबहुल भागातही ठाकरेंची पीछेहाट होताना दिसते.

काँग्रेस मुळे ठाकरेंना फटका

अनेक वॉर्डामध्ये काँग्रेस उमेदवार म्हणून ठाकरे गटाला फटका बसल्याचे चित्र पाहायला मिळाले. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे जरी एकत्र आले असले आणि त्यामुळे मराठी मते मोठ्या प्रमाणावर खेचण्यात ठाकरे बंधूंना यश आलं असले  उत्तर भारतीय आणि अमराठी मते काँग्रेसकडे शिफ्ट झाल्याने मत विभागणी झाली आणि त्याचा फटका तिन्ही पक्षांना बसला असे सध्याचे चित्र सांगते.