BMC Election Result : मुंबईत तब्बल 75 अमराठी नगरसेवक; भाजपचे सर्वाधिक 33

Published:
आता समोर आलेल्या आकड्यानुसार, मुंबई महापालिकेच्या विजयी 227 नगरसेवकांमध्ये तब्बल 75 अमराठी प्रतिनिधी आहेत. यात सर्वाधिक नगरसेवक हे भाजपचे आहेत.
BMC Election Result : मुंबईत तब्बल 75 अमराठी नगरसेवक; भाजपचे सर्वाधिक 33

BMC Election Result : संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागलेल्या मुंबई महापालिका निवडणुकीच्या निकालांचे चित्र स्पष्ट झाले असून महायुतीने यंदा आघाडी घेतली. 227 सदस्यीय महापालिकेत भाजपने सर्वाधिक 89 जागा जिंकून पुन्हा एकदा आपली ताकद सिद्ध केली आहे. शिंदे गटाच्या शिवसेनेला 29, उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला 65, काँग्रेसला 24, मनसेला 6, राष्ट्रवादी अजित पवार गटाला 3, राष्ट्रवादी शरद पवार गटाला 1, समाजवादी पक्षाला 2 तर एमआयएमला 7 जागा मिळाल्या आहेत. मात्र यामध्ये अनेक मराठी नगरसेवकांची एंट्री चर्चेचा विषय ठरली आहे.

मराठीच्या मुद्द्यावरूनच तापलं राजकारण (BMC Election Result)

खरंतर मुंबई महापालिका निवडणुकीपूर्वीच मराठी आणि अ मराठी या मुद्द्यावरून राजकीय वातावरण तापलं होतं कारण म्हणजे ठाकरे बंधूंनी निवडणुकीच्या प्रचारातच मराठीचा मुद्दा आवळून धरला होता. भाजप तर दरवेळी जास्तीत जास्त मराठी उमेदवारांना संधी देते या मागचं कारण म्हणजे उत्तर भारतीय आणि गुजराती मतदार हा नेहमीच भाजपकडे मोठ्या आशेने बघत असतो. याउलट ठाकरे बंधूंची स्थिती अगदी उलट होती. मात्र तरीही ठाकरे बदलून कडून सुद्धा अनेक मराठी उमेदवारांना यंदा संधी देण्यात आली होती. त्यामुळे निकालानंतर मुंबईत किती मराठी नगरसेवक निवडून आले याची चर्चा सुरू झाली. BMC Election Result

कोणाचे किती अमराठी नगरसेवक

आता समोर आलेल्या आकड्यानुसार, मुंबई महापालिकेच्या विजयी 227 नगरसेवकांमध्ये तब्बल 75 अमराठी प्रतिनिधी आहेत. यात सर्वाधिक नगरसेवक हे भाजपचे आहेत. भाजपचे 33 परप्रांतीय प्रतिनिधी असून काँग्रेसचे 18 नगरसेवक, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंचे 8, आणि एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे 4 नगरसेवक अमराठी आहेत. मुंबई महापालिकेत मराठी नगरसेवकांची वाढती संख्या नक्कीच विचार करण्यासारखी आहे.

Asavari Khedekar Burumbadkar
लेखकाबद्दल
आसावरी ओंकार बुरुंबाडकर गेली 4 वर्ष पत्रकारितेत काम करत आहे. सध्या MP मराठी Breaking मध्ये डिजिटल कंटेट रायटर म्हणून कार्यरत आहे. आसावरीला मनोरंजन, अध्यात्म, लाईफस्टाईल अशा विविध विषयांमध्ये रुची आहे. यापूर्वी तिने एबीपी माझा, रत्नागिरी टाईम्स या मीडिया हाऊसमध्ये काम केलं आहे. डिजिटल माध्यमात काम करताना वृत्तपत्रांमध्ये विविध विषयावर लिखाण केलं आहे. डिजिटलमध्ये काम करताना ती वाचनाची आणि लिखाणाचीही आवड जपते. View all posts by Asavari Khedekar Burumbadkar
Follow Us :GoogleNews