BMC Election Result : मुंबईत शिंदे गटाला धक्का! समाधान सरवणकरांचा पराभव

Published:
मुंबई महानगरपालिका निवडणूक २०२६ मध्ये राजकीय वातावरण तापले असताना प्रभाग क्रमांक १९४ मधील निकालाने राज्याच्या राजकारणात नवे संकेत दिले आहेत. शिंदे गटाच्या शिवसेनेला या प्रभागातून मोठा धक्का बसला असून त्यांच्या उमेदवार समाधान सरवणकर यांचा ५९२ मतांनी पराभव झाला आहे
BMC Election Result : मुंबईत शिंदे गटाला  धक्का! समाधान सरवणकरांचा पराभव

BMC Election Result : मुंबई महानगरपालिका निवडणूक २०२६ मध्ये राजकीय वातावरण तापले असताना प्रभाग क्रमांक १९४ मधील निकालाने राज्याच्या राजकारणात नवे संकेत दिले आहेत. शिंदे गटाच्या शिवसेनेला या प्रभागातून मोठा धक्का बसला असून त्यांच्या उमेदवार समाधान सरवणकर यांचा ५९२ मतांनी पराभव झाला आहे. ठाकरे गटाच्या शिवसेनेचे निशिकांत गोविंद शिंदे यांनी सरवणकर यांना मागे टाकत विजय मिळवला आहे.

निवडणुकीपूर्वीच चर्चेत होता वॉर्ड

या निवडणुकीतील मोठ्या घडामोडींमध्ये मनसेतून भाजपमध्ये प्रवेश केलेल्या संतोष धुरी यांनी या वॉर्डासाठी निशिकांत शिंदेंना उमेदवारी मिळवून दिली. त्यामुळे या प्रभागातील राजकीय गणितात मोठा बदल झाला आणि अखेरीस मतदारांनी ठाकरे गटावर विश्वास दाखवत निशिकांत शिंदेंना प्रतिनिधित्वाची संधी दिली.

११ उमेदवार रिंगणात होते (BMC Election Result)

प्रभाग १९४ मध्ये एकूण ११ उमेदवार रिंगणात असल्याने ही लढत अत्यंत चुरशीची ठरली. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी गटातून पुजा विजय पवार, सनय छत्रपती शासन गटातून सुहासिनी कांबळे, वंचित बहुजन आघाडीचे शंकर उर्फ अशोक गुजेट्टी तसेच सात अपक्ष उमेदवारांनी या वॉर्डातील स्पर्धा अधिक तीव्र केली. अनेक पक्ष आणि अपक्षांनी मैदानात उतरल्याने मतविभाजनाची शक्यता होती, परंतु तरीही मतदारांनी स्पष्टपणे एकाच उमेदवाराला पसंती दर्शवली.BMC Election Result

मुंबई महानगरपालिका ही राज्याच्या अर्थकारणाची धुरा मानली जाते. इथली सत्ता कोणाकडे जाते, त्यावर महाराष्ट्रातील आर्थिक आणि प्रशासकीय दिशाही ठरते, अशी धारणा आहे. त्यामुळे मुंबईतील प्रत्येक प्रभागातील निकालाला महत्व असते. या पार्श्वभूमीवर समाधान सरवणकर यांच्या पराभवाने शिंदे गटासाठी हा धक्का अधिक गंभीर मानला जात आहे. मुंबईसारख्या महत्वाच्या शहरात विजय मिळवून स्थान मजबूत करण्याचे शिंदे शिवसेनेचे प्रयत्न या निकालामुळे आव्हानात्मक ठरणार आहेत.

दुसरीकडे ठाकरे गटासाठी हा विजय मनोबल वाढवणारा ठरला आहे. काही काळापासून मुंबईतील राजकीय समीकरणे त्यांच्यापुढे आव्हानात्मक होती, परंतु या प्रभागातील विजयामुळे त्यांचा आत्मविश्वास वाढण्याची शक्यता आहे. प्रभाग १९४ चा निकाल Mumbai BMC निवडणुकीतील वातावरण आणखी रंगतदार करणारा ठरला आहे. आगामी निकालांवर या पराभवाचा काय परिणाम होतो, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

Asavari Khedekar Burumbadkar
लेखकाबद्दल
आसावरी ओंकार बुरुंबाडकर गेली 4 वर्ष पत्रकारितेत काम करत आहे. सध्या MP मराठी Breaking मध्ये डिजिटल कंटेट रायटर म्हणून कार्यरत आहे. आसावरीला मनोरंजन, अध्यात्म, लाईफस्टाईल अशा विविध विषयांमध्ये रुची आहे. यापूर्वी तिने एबीपी माझा, रत्नागिरी टाईम्स या मीडिया हाऊसमध्ये काम केलं आहे. डिजिटल माध्यमात काम करताना वृत्तपत्रांमध्ये विविध विषयावर लिखाण केलं आहे. डिजिटलमध्ये काम करताना ती वाचनाची आणि लिखाणाचीही आवड जपते. View all posts by Asavari Khedekar Burumbadkar
Follow Us :GoogleNews