BMC Election Result : मुंबई महापालिका निवडणुकीच्या निकालाचे कल हाती येत असून भाजप आणि शिंदे गटाने बहुमताचा आकडा पार केला असल्याचे चित्र टीव्ही चॅनेलवर दिसत आहे. मात्र अजूनही अनेक वार्डातील मतमोजणी बाकी आहे, टीव्हीवर दिसत आहे ते आकडे खोटे आहेत असा दावा शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे . एवढेच नव्हे तर दहा वाजेपर्यंत थांबा सर्व निकाल स्पष्ट होईल आणि मुंबईत आमचाच महापौर होईल असा विश्वासही संजय राऊतानी व्यक्त केला.
खोटे आकडे दाखवून भ्रम
संध्याकाळी प्रसार माध्यमांशी बोलताना संजय राऊत म्हणाले की, सकाळी जे आकडे टीव्हीवर दाखवले जात होते, भाजपकडून जो भ्रम निर्माण केला जात होता, ते सर्व आकडे खोटे आहेत. खोटे आकडे देऊन तुम्ही काय करणार? ही गोष्ट खरी आहे की भाजपमध्ये आणि आमच्यात अतितटीची लढाई आहे . परंतु तुम्ही जो फरक दाखवत आहे तेवढा तो नाही. BMC Election Result
3 वाजल्या नंतरचे कल आमच्या बाजूने (BMC Election Result)
संजय राऊत पुढे म्हणाले, दुपारी तीन वाजल्यानंतर जे निकाल यायला सुरुवात झाली त्यातील 80 ते 85 टक्के निकाल हे शिवसेना ठाकरे गटाच्या विजयाचे आहेत. आताच मला सांगितलं की वैशाली पाटणकर या विजयी झाल्या, विशाखा राऊत विजयी झाल्या, यशवंत किल्लेदरा आघाडीवर आहेत. बांदरामधून रोहिणी कांबळ जिंकल्या, त्यानंतर भांडूप, विक्रोळीमधून देखील शिवसेनेचे उमेदवार आघाडीवर आहेत, असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे. अजूनही दादरची मतमोजणी बाकी आहे. दहा वाजेपर्यंत संपूर्ण निकाल स्पष्ट होईल. मुंबईत ठाकरे बंधूंचाच महापौर बसेल असा विश्वास संजय राऊत यांनी व्यक्त केला.






