Cabinet Decision : फडणवीस सरकारचा कामाचा धडाका!! मंत्रिमंडळ बैठकीत 4 मोठे निर्णय

Published:
सामान्य प्रशासन विभाग, ग्रामविकास व पंचायत राज विभाग, महसूल विभाग, आणि नगर विकास विभाग खात्याच्या अंतर्गत हे निर्णय घेण्यात आले आहेत. यामध्ये अण्णाभाऊ साठे यांच्य स्मारका बाबत निर्णय सरकारने घेतला आहे.
Cabinet Decision :  फडणवीस सरकारचा कामाचा धडाका!! मंत्रिमंडळ बैठकीत 4 मोठे निर्णय

Cabinet Decision : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडली.  या बैठकीत चार मोठे निर्णय घेण्यात आले आहेत. सामान्य प्रशासन विभाग, ग्रामविकास व पंचायत राज विभाग, महसूल विभाग, आणि नगर विकास विभाग खात्याच्या अंतर्गत हे निर्णय घेण्यात आले आहेत. यामध्ये अण्णाभाऊ साठे यांच्य स्मारका बाबत निर्णय सरकारने घेतला आहे.

मंत्रिमंडळ बैठकीतील महत्त्वाचे निर्णय (Cabinet Decision)

1. ग्राम, तालुका व जिल्हा प्रशासन सक्षम करण्यासाठी जिल्हा कर्मयोगी २.० व सरपंच संवाद कार्यक्रम राबविणार (सामान्य प्रशासन विभाग)

2. राज्यातील जिल्हा परिषदांतर्गत आरोग्य विभागामध्ये कार्यरत व सेवानिवृत्त झालेल्या बंधपत्रित आरोग्य सेविकांच्या नियुक्त्या नियमित होणार. (ग्रामविकास व पंचायत राज विभाग)

3. धाराशिव शहरात साहित्य सम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा पुतळा उभारण्यासाठी दुग्धव्यवसाय विकास विभागाची एक एकर जागा. (महसूल विभाग)

4. महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम, 1965 मध्ये सुधारणा करणार. नगरपरिषदा आणि नगरपंचायतीच्या थेट निवडून आलेल्या अध्यक्षास सदस्यत्व मिळणार. मताचाही अधिकार. अधिनियमातील सुधारणेसाठी अध्यादेश काढणार. (नगर विकास विभाग)

चौथ्या निर्णयाने सगळे अवाक्

यातील चौथ्या निर्णयामुळे सर्वजण आवक झाले आहेत. हा निर्णय नुकताच पार पडलेल्या नगपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकीसंदर्भात आहे. या निवडणुकीत महायुतीने चांगली कामगिरी केली. असे असताना आता हा निर्णय समोर आला आहे. राज्य सरकारच्या या निर्णयाची सगळीकडे चर्चा होत आहे.