Wed, Dec 31, 2025

Cabinet Decision : मंत्रिमंडळ बैठकीत फक्त एकच निर्णय; या संस्थेला विनामूल्य दिली जमीन

Published:
महसूल विभागा च्या अंतर्गत हा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयानुसार अमरावतीच्या अंबादेवी संस्थानास चिखलदरा येथील महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाची तीन एकर जमीन देण्याचा निर्णय फडणवीस सरकारने घेतला आहे.
Cabinet Decision : मंत्रिमंडळ बैठकीत फक्त एकच निर्णय; या संस्थेला विनामूल्य दिली जमीन

Cabinet Decision : आज वर्षाच्या शेवटच्या दिवशी महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या बैठकीत केवळ एकच निर्णय घेण्यात आला त्यामुळे सर्वत्र आश्चर्य व्यक्त करण्यात येते. महसूल विभागा च्या अंतर्गत हा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयानुसार अमरावतीच्या अंबादेवी संस्थानास चिखलदरा येथील महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाची तीन एकर जमीन देण्याचा निर्णय फडणवीस सरकारने घेतला आहे.

विनामूल्य दिली जमीन (Cabinet Decision)

चंद्रशेखर बावनकुळे यांच्या महसूल खात्याने अमरावती जिल्ह्यातील मौजे चिखलदरा येथील ‘श्री अंबादेवी संस्थान, अमरावती’ला महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाची सुमारे 3 एकर 8 आर जमीन देण्यास मान्यता दिली आहे. अंबादेवी संस्थानास ही जमीन विनामुल्य उपलब्ध करून देण्यात येणार आहे. तसेच ही जमीन मंदिर संस्थानाला भोगवटादार वर्ग-2 म्हणून मिळणार आहे. विशेष म्हणजे सदर जमीन अंबादेवी संस्थानास धार्मिक उपक्रमासाठी वापरता येणार आहे.

५० वर्षात शुन्य काम

चिखलदरा येथील सुमारे साडे सात एकर जमीन १९७५ मध्ये महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाला पर्यटकांसाठी मुलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी देण्यात आली होती. पण ही जमीन वापराविना पडून होती. गेल्या 50 वर्षांत महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने या जमिनीवर काही काम केले नाही. त्यामुळे वापराविना पडून असलेली जमीन ताब्यात घेतली आहे. Cabinet Decision

श्री अंबादेवी संस्थान यांनी चिखलदरा येथील देवी पॉईंट आणि विराट देवी देवस्थान यांच्या व्यवस्थापनाची जबाबदारी आहे. या संस्थानाने या दोन्ही देवस्थानच्या विकासासाठी शासनाकडे जमिनीची मागणी केली होती. त्यानुसार पर्यटन विकास महामंडळाकडील सुमारे तीन एकर ८ आर जमीन शासन जमा करून घेऊन, ती श्री. अंबादेवी संस्थानास विनामुल्य उपलब्ध करून देण्यात येणार आहे