महाराष्ट्र काँग्रेसने अखेर आपली नवी प्रदेश कार्यकारिणी जाहीर केली आहे. पक्षाच्या नव्या प्रदेशाध्यक्षपदी नुकतेच नियुक्त झालेल्या हर्षवर्धन सपकाळ यांच्या नेतृत्वात ही कार्यकारिणी दिल्लीतील केंद्रीय नेतृत्वाच्या मंजुरीनंतर अधिकृतपणे जाहीर करण्यात आली. राज्यात काँग्रेसला नव्याने उभारी देण्याचा प्रयत्न या निमित्ताने केला जात आहे.
राज्यात काँग्रेसची नवी प्रदेश कार्यकारिणी
नव्या कार्यकारिणीत ज्येष्ठ आणि अनुभवी नेत्यांसह तरुण अन् नव्या दमाचे चेहरे सामाविष्ट करण्यात आले आहेत. आगामी विधानसभा आणि लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्षाला नवसंजीवनी मिळेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे. कार्यकारिणी महाराष्ट्रातील सध्याची राजकीय परिस्थिती, आगामी निवडणूक रणनीती आणि सामाजिक प्रतिनिधित्व लक्षात घेऊन तयार करण्यात आली आहे. या कार्यकारिणीत नेतृत्व, संघटन कौशल्य, अनुभवी मार्गदर्शन आणि तरुणांचा जोश असा समतोल साधण्याचा प्रयत्न स्पष्टपणे दिसून येतो.
काँग्रेसच्या राज्यातील नव्या टीमची रचना
मेश चेन्नीथला – अखिल भारतीय काँग्रेसचे महाराष्ट्रप्रमुख (इन-चार्ज) व चेअरमन
हर्षवर्धन सपकाळ – नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष
विजय वडेट्टीवार – विरोधी पक्षनेते
संघटनेतील इतर प्रमुख सदस्य
सतेज उर्फ बंटी पाटील, मुकुल वासनिक,अविनाश पांडे,बाळासाहेब थोरात,सुशीलकुमार शिंदे ,पृथ्वीराज चव्हाण ,रजनी पाटील,मानिकराव ठाकरे,नाना पटोले ,वर्षा गायकवाड,इमरान प्रतापगढी,सुनील केदार,डॉ. नितीन राऊत,अमित देशमुख,यशोमती ठाकुर,शिवाजी मोघे,चंद्रकांत हंडोरे,अरिफ नसीम खान,प्रणिती शिंदे,मुजफ्फर हुसैन,के. सी. पडवी,अस्लम शेख,विश्वजित कदम,कल्याण काळे,प्रा. वसंत पुरके,अमिन पटेल…अशी मंडळी नव्या कार्यकारिणीत आहेत.
नव्या कार्यकारिणीच्या माध्यमातून काँग्रेसने संघटनेला मजबुती देण्याचा आणि प्रत्येक समाजघटकाचा समावेश करण्याचा प्रयत्न केला आहे. अनुभवी नेत्यांची उपस्थिती पक्षाला स्थैर्य देईल, तर नव्या चेहऱ्यांच्या सहभागामुळे जनसंपर्क वाढण्यास हातभार लागेल, अशी काँग्रेसच्या वर्तुळात चर्चा आहे. यानिमित्ताने काँग्रेसला राज्यात उभारी मिळते, का हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.






