Marathi News

Devendra Fadnavis : पूरग्रस्त शेतकऱ्यांना सर्वात मोठा दिलासा; मुख्यमंत्री फडणवीसांची महत्वाची घोषणा

Published:
आम्ही सर्व निकष बाजूला ठेवून शेतकऱ्यांना सरसकट मदत करणार आहोत, कुठंही अधिकचे निकष न लावता आणि आवश्यकता असेल तर निकष शिथिल करून सरकार शेतकऱ्यांची मदत करेल.
Devendra Fadnavis : पूरग्रस्त शेतकऱ्यांना सर्वात मोठा दिलासा; मुख्यमंत्री फडणवीसांची महत्वाची घोषणा

राज्यातील अतिवृष्टी आणि पूरग्रस्त शेतकऱ्यांना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी मोठा दिलासा दिलेला आहे. सर्व निकष बाजूला ठेवून शेतकऱ्यांना सरसकट मदत करणार आहोत अशी मोठी घोषणा देवेंद्र फडणीस यांनी केली. यापूर्वी पंचनामाच्या मुद्यावरून शेतकऱ्यांमध्ये मोठ्या संभ्रमाचे वातावरण होतं. आपल्याला मदत मिळणार की नाही याबद्दल शेतकऱ्याच्या मनात चिंता होती. अखेर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सरसकट मदत देणार असल्याचे जाहीर केले आणि बळीराजाला मोठा दिलासा मिळाला.

काय म्हणाले देवेंद्र फडणवीस? Devendra Fadnavis

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल औसा तालुक्यातील उजणी आणि निलंगा तालुक्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानाची पहाणी केली, यावेळी बोलताना त्यांनी अतिवृष्टी ग्रस्त शेतकऱ्यांना मोठा दिलासा दिला.. फडणवीस यांनी म्हटल, आम्ही सर्व निकष बाजूला ठेवून शेतकऱ्यांना सरसकट मदत करणार आहोत, कुठंही अधिकचे निकष न लावता आणि आवश्यकता असेल तर निकष शिथिल करून सरकार शेतकऱ्यांची मदत करेल.

दिवाळीपूर्वी पैसे मिळणार

देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) पुढे म्हणाले,  आम्ही मदतीचा निधी  रीलीज करायला सुरुवात केली आहे. पूरग्रस्तांच्या मदतीसाठी 2 हजार 200 कोटींचा पहिला हाप्ता मंजूर झाला आहे. दिवाळीपूर्वीच सर्व शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पैसे जमा होतील अशी माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिली. फडणवीस यांच्या या घोषणेमुळे शेतकऱ्यांना काही प्रमाणात आता दिलासा मिळण्याची शक्यता आहे.

दरम्यान यंदा राज्यातील मराठवाड्यात पावसामुळे सर्वाधिक नुकसान झालं आहे. मराठवाड्यातील नदी नाले दुथड्या भरून वाहत आहेत. अनेक नद्यांना पूर आल्यानं पुराचं पाणी गावात शिरल्याचं चित्र आहे, काही ठिकाणी गावाला पुराचा वेढा पडल्यानं नागरिक गावात अडकले आहेत. शेतकऱ्यांच्या शेतातही मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. शेतकऱ्याचे उभे पीक पाण्याखाली गेल आहे. धक्कादायक बाप म्हणजे फक्त एकच गेले नाही तर शेतकऱ्याची संपूर्ण जमीन सुद्धा महापुरात वाहून गेली आहे. त्यामुळे पुन्हा माती तयार होण्यास आणि नवीन पिक काढण्यास शेतकऱ्यांना मोठा काळ लागणार आहे

Asavari Khedekar Burumbadkar
लेखकाबद्दल
आसावरी ओंकार बुरुंबाडकर गेली 4 वर्ष पत्रकारितेत काम करत आहे. सध्या MP मराठी Breaking मध्ये डिजिटल कंटेट रायटर म्हणून कार्यरत आहे. आसावरीला मनोरंजन, अध्यात्म, लाईफस्टाईल अशा विविध विषयांमध्ये रुची आहे. यापूर्वी तिने एबीपी माझा, रत्नागिरी टाईम्स या मीडिया हाऊसमध्ये काम केलं आहे. डिजिटल माध्यमात काम करताना वृत्तपत्रांमध्ये विविध विषयावर लिखाण केलं आहे. डिजिटलमध्ये काम करताना ती वाचनाची आणि लिखाणाचीही आवड जपते. View all posts by Asavari Khedekar Burumbadkar
Follow Us :GoogleNews