Marathi News

Devendra Fadnavis : ओला दुष्काळाच्या सर्व सवलती लागू; फडणवीसांची मोठी घोषणा

Published:
पूरग्रस्त शेतकऱ्यांना ओला दुष्काळाच्या सर्व सवलती लागू होतील तसेच दिवाळीपर्यंत त्यांना आर्थिक मदत मिळेल अशी माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिली
Devendra Fadnavis : ओला दुष्काळाच्या सर्व सवलती लागू; फडणवीसांची मोठी घोषणा

राज्यातील अतिवृष्टी ग्रस्त शेतकऱ्यांसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी मोठी घोषणा केली आहे. पूरग्रस्त शेतकऱ्यांना ओला दुष्काळाच्या सर्व सवलती लागू होतील तसेच दिवाळीपर्यंत त्यांना आर्थिक मदत मिळेल अशी माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिली. राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांना दिलासा देणारी बातमी दिली.

काय म्हणाले देवेंद्र फडणवीस? Devendra Fadnavis

खरंतर राज्यातील एकूण पुरपरिस्थिती बघता सरकारने ओला दुष्काळ जाहीर करावा आणि शेतकऱ्यांना तात्काळ मदत करावी अशी मागणी विरोधकांनी उचलून धरली आहे. मात्र देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी आज वेगळंच मत मांडले. ओला दुष्काळाची मागणी सातत्याने केली जाते मात्र आजपर्यंत कधीच ओल्या दुष्काळाची घोषणा झालेली नाही. मॅन्यूअलमध्ये ओला दुष्काळ ही संकल्पनाच नाही, तरीही दुष्काळाच्या सर्व सवलती लागू केल्या जातील. ओला दुष्काळ जाहीर करायचा अर्थ असतो की त्या सवलती लागू करा, तशा सगळ्या सवलती या लागू करण्याचा निर्णय हा राज्याच्या मंत्रिमंडळाने घेतलेला आहे. आता ही सगळी नुकसानाची आकडेवारी जमा होते की पूर्ण जमा पुढच्या दोन-तीन-चार दिवसात होईल अशी माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

दिल्ली मदत करणार –

फडणवीस पुढे म्हणाले, पुढील 2 ते 3 दिवसात नुकसानीची माहिती मिळेल. 60 लाख हेक्टरचं नुकसान झाल्याचा अंदाज. पुढील आठवड्यात मदत जाहीर करणार आहोत. पहिल्या टप्प्यात ऑगस्टपर्यंत नुकसानीचे 2200 कोटी वितरित करण्यास सुरूवात करण्यात आली आहे. दिल्लीनं महाराष्ट्राला मदत करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र आम्ही दिल्लीच्या मदतीची वाट न पाहता मदत करणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.

Asavari Khedekar Burumbadkar
लेखकाबद्दल
आसावरी ओंकार बुरुंबाडकर गेली 4 वर्ष पत्रकारितेत काम करत आहे. सध्या MP मराठी Breaking मध्ये डिजिटल कंटेट रायटर म्हणून कार्यरत आहे. आसावरीला मनोरंजन, अध्यात्म, लाईफस्टाईल अशा विविध विषयांमध्ये रुची आहे. यापूर्वी तिने एबीपी माझा, रत्नागिरी टाईम्स या मीडिया हाऊसमध्ये काम केलं आहे. डिजिटल माध्यमात काम करताना वृत्तपत्रांमध्ये विविध विषयावर लिखाण केलं आहे. डिजिटलमध्ये काम करताना ती वाचनाची आणि लिखाणाचीही आवड जपते. View all posts by Asavari Khedekar Burumbadkar
Follow Us :GoogleNews