Devendra Fadnavis : फडणवीसांकडूनही “लाव रे तो व्हिडिओ”; ठाकरे बंधूंचं सगळंच काढलं

Published:
या व्हिडीओमध्ये राज ठाकरे कधी उद्धव ठाकरे यांच्यावर सडकून टीका करत असताना दिसत आहे तर दुसरीकडून उद्धव ठाकरे हेदेखील राज ठाकरे यांच्यावर थेट हल्लाबोल करत असल्याचे दाखवण्यात आले
Devendra Fadnavis : फडणवीसांकडूनही “लाव रे तो व्हिडिओ”; ठाकरे बंधूंचं सगळंच काढलं

Devendra Fadnavis : मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज शिवाजी पार्क येथे महायुतीची जाहीर सभा पार पडली. या सभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लाव रे तो व्हिडिओ म्हणत उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांची पोलखोल केली. एकेकाळी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकमेकांवर कोणत्या भाषेत टीका करत होते हे फडणवीस यांनी व्हिडिओच्या माध्यमातून मुंबईकरांच्या समोर आणलं. तसेच सत्तेसाठी हे ठाकरे बंधू एकत्र आले आहेत, असेही फडणवीस म्हणाले.

जुने व्हिडिओ दाखवले ( Devendra Fadnavis)

काही गोष्टी या संवादापेक्षा वेगळ्या संवादात बोलावं लागतो. मी त्यांच्याच शब्दात सांगतो, असे म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचे एकमेकांवरती टीका केलेले जुने व्हिडिओ सुरू केले.  या व्हिडीओमध्ये राज ठाकरे कधी उद्धव ठाकरे यांच्यावर सडकून टीका करत असताना दिसत आहे तर दुसरीकडून उद्धव ठाकरे हेदेखील राज ठाकरे यांच्यावर थेट हल्लाबोल करत असल्याचे दाखवण्यात आले. इतकचं नव्हे तर संजय राऊत आणि आदित्य ठाकरे राज ठाकरेंवर काय टीका करायचे हे देखील दाखवले. ( Devendra Fadnavis)

उद्धव ठाकरेंना लाज वाटली पाहिजे

यावेळी देवेंद्र फडणीस यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर चांगलाच प्रहार केला. तुम्ही म्हणता, दुसऱ्याची लेकरं स्वत:च्या मांडीवर खेळवता, तुम्ही माझ्या आई-वडिलांवर बोललात. उद्धव ठाकरे लाज वाटली पाहिजे, मी तुमच्या कुटुंबियांवर टिका करणार नाही, माझ्यावरती ते संस्कार नाहीत. मी त्या बापाचा पोरगा आहे जो राष्ट्रीय सेवक संघाचा सदस्य होता. मी त्या बापाचा पोरगा ज्याने कधी संपत्ती कमावली नाही.  माझे वडील स्वर्गातून पाहत असतील तेव्हा त्यांना वाटत असेल माझा मुलगा हिंदुत्व जपतोय. पण तुमचे वडिल बघत असतील तर काय बोलत असतील जेव्हा तुम्ही रशीदमामूला सोबत घेऊन आहात, अशा  शब्दात देवेंद्र फडणवीसांनी उद्धव ठाकरेंना प्रत्युत्तर दिले.

Asavari Khedekar Burumbadkar
लेखकाबद्दल
आसावरी ओंकार बुरुंबाडकर गेली 4 वर्ष पत्रकारितेत काम करत आहे. सध्या MP मराठी Breaking मध्ये डिजिटल कंटेट रायटर म्हणून कार्यरत आहे. आसावरीला मनोरंजन, अध्यात्म, लाईफस्टाईल अशा विविध विषयांमध्ये रुची आहे. यापूर्वी तिने एबीपी माझा, रत्नागिरी टाईम्स या मीडिया हाऊसमध्ये काम केलं आहे. डिजिटल माध्यमात काम करताना वृत्तपत्रांमध्ये विविध विषयावर लिखाण केलं आहे. डिजिटलमध्ये काम करताना ती वाचनाची आणि लिखाणाचीही आवड जपते. View all posts by Asavari Khedekar Burumbadkar
Follow Us :GoogleNews