राज्यभरातील प्रत्येक घरात ‘ज्ञानेश्वरी’!, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून मोफत ग्रंथवाटपाची घोषणा – मंत्री भरत गोगावले यांची माहिती

Written by:Astha Sutar
Published:
राज्य सरकारकडून एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाने आळंदी पारायण सोहळ्यासाठी २ कोटी रुपयांचा विशेष निधी देण्यात आला आहे. रायगडसारख्या शिवस्मारकांनाही वारकऱ्यांनी दर्शनासाठी अवश्य भेट द्यावी, असेही आवाहन मंत्री गोगावले यांनी केले.
राज्यभरातील प्रत्येक घरात ‘ज्ञानेश्वरी’!, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून मोफत ग्रंथवाटपाची घोषणा – मंत्री भरत गोगावले यांची माहिती

Bharat Gogavle – “घरात बसणाऱ्यांपेक्षा हिंदुत्वाचा विचार घेऊन जनतेत उतरलेल्या एकनाथ शिंदे यांच्यासारख्या नेत्यासोबत जाणे हेच योग्य ठरतं. त्यांचं संतविचारांवर निष्ठा आणि वारकऱ्यांप्रती प्रेम आहे,” असे मंत्री भारत गोगावले म्हणाले. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पुढाकाराने आणि शिवसेना धर्मवीर आध्यात्मिक सेनेच्या माध्यमातून राज्यभर मोफत ज्ञानेश्वरी ग्रंथाचे वाटप करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

श्रीक्षेत्र आळंदी येथे सुरु असलेल्या संत श्री ज्ञानेश्वर माऊली यांच्या ७५० व्या जन्मोत्सवाच्या पार्श्वभूमीवर आयोजित ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याच्या उद्घाटनप्रसंगी राज्याचे रोजगार हमी, फलोत्पादन व खारभूमी विकास मंत्री भरत गोगावले यांनी महत्त्वपूर्ण घोषणा केली.

आळंदी पारायणासाठी २ कोटींचा निधी…

दरम्यान, रायगडसारख्या शिवस्मारकांनाही वारकऱ्यांनी दर्शनासाठी अवश्य भेट द्यावी, असेही आवाहन मंत्री गोगावले यांनी केले. उपमुख्यमंत्री शिंदेंकडून शिवसेना धर्मवीर अध्यात्मिक सेनेचे प्रदेशाध्यक्ष श्री अक्षय महाराज भोसले पूर्णवेळ समन्व्यक म्हणून आळंदी येथे उपस्थित आहेत. राज्य सरकारकडून एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाने आळंदी पारायण सोहळ्यासाठी २ कोटी रुपयांचा विशेष निधी देण्यात आला आहे. उद्घाटन सोहळ्यात आळंदी देवस्थानचे प्रमुख विश्वस्त योगी निरंजननाथ, अॅड. राजेंद्र उमाप, चैतन्य महाराज कबीर, पुरुषोत्तम महाराज पाटील, भगवान पोखरकर आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.

विशेष महत्त्वाचे मुद्दे –

– आळंदी पारायण सोहळ्यासाठी उप मुख्यमंत्री शिंदेकडून २ कोटींचा निधी
– वारकऱ्यांचे लाडके नेते म्हणजे उप मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब
– उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्फत राज्यभर मोफत ‘ज्ञानेश्वरी’ वाटप
– शिवरायांची समाधी रायगडावर प्रत्येकाने जावे – ऐतिहासिक स्मरण

Astha Sutar
लेखकाबद्दल
Follow Us :GoogleNews