Eknath Shinde : मुंबई महापालिका निवडणुकीत भाजप आणि शिंदे यांच्या महायुतीला 118 जागा मिळाल्या. सत्ता स्थापनेसाठी आवश्यक असलेल्या 114 जागेचा आकडा गाठल्याने महायुतीचा महापौर आरामात बसेल असं सर्वांना वाटलं होतं . मात्र दुसऱ्या दिवशी एकनाथ शिंदे यांनी आपल्या 29 विजयी नगरसेवकांना मुंबईतील हॉटेल ताज लँड्स मध्ये मुक्कामी ठेवल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली. एकनाथ शिंदे हे भाजपवर टाकत आहेत का?? ते उद्धव ठाकरेंसोबत युती करतील का? या चर्चांना यामुळे जोर आला. मात्र अखेर शिंदे यांनी आज या सर्व चर्चांवर स्पष्टीकरण दिले.

काय म्हणाले एकनाथ शिंदे (Eknath Shinde)

मुंबईकर नागरिकांनी मोठ्या विश्वासाने महायुती म्हणून सेना – भाजपला मतदान केले असून त्यांच्या मतांशी प्रतारणा करून कोणताही वेगळा निर्णय शिवसेना घेणार नाही. नागरिकांनी याबाबत कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये अशी माहिती एकनाथ शिंदे यांनी दिली. बाळासाहेबांचा आशीर्वाद, नरेंद्र मोदींच्या मार्गदर्शनाखाली या निवडणुका लढल्या गेल्या. त्यानुसार ज्या ज्या ठिकाणी आम्ही महायुतीत लढलो त्या त्या ठिकाणी महायुतीचाच महापौर निवडून येणार. लोकांनी विकासाला स्विकारलं आहे. भावनिक मुद्द्यांना लोकांनी  नाकारलं आहे. त्यामुळे मुंबईकरांचा आदर करण्याचं काम महायुती करणार आहे,” असं एकनाथ शिंदे म्हणाले आहेत. Eknath Shinde

ती कार्यकर्त्यांची भावना असू शकते

बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दीच्या वर्षानिमित्त मुंबईत शिवसेनेचा महापौर व्हावा अशी मागणी शिवसेनेकडून केली जात आहे. त्यावर बोलताना ही कार्यकर्त्यांची भावना असू शकते असंही शिंदे म्हणाले.