राज्यात यंदाच्या धुव्वाधार पावसामुळे होत्याचे नव्हते झाले आहे…. मराठवाडा आणि विदर्भात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्याचे उभं पीक पाण्याखाली गेला आहे… एकीकडे शेतात पाणीच पाणी बघायला मिळतंय तर दुसरीकडे बळीराजाच्या डोळ्यात त्याच्यापेक्षा जास्त पाणी आहे…. आधीच आर्थिक संकटात असलेल्या बळीराजा अतिवृष्टीमुळे पुरता कोलमडलेला आहे…. सरकारकडून नुकसान भरपाईसाठी तो अक्षरशा टाहो फोडतोय… अखेर आज राज्य सरकारने अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाईसाठी (Eknath Shinde On Flood Affected Farmers)निधी मंजूर केलाय. आता हा निधी दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होईल अशी माहिती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे.
सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी – Eknath Shinde On Flood Affected Farmers
आज दुपारी राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडली… या बैठकीत अतिवृष्टी ग्रस्त शेतकऱ्यांच्या आर्थिक मदतीसाठी 1339 कोटी रुपये मंजूर करण्यात आले. या बैठकीनंतर पत्रकारांशी संवाद साधताना एकनाथ शिंदे यांनी म्हटलं, यावर्षी पावसामुळे शेतीचे मोठे नुकसान झाले आहे.. शेतकरी हवालदिल झाला आहे. अनेक शेतकऱ्यांच्या शेतातील माती देखील वाहून गेली आहे. या सर्व मुद्द्यांवर आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चा झाली. अतिवृष्टी ग्रस्त भागातील शेतीच्या नुकसानीचे युद्धपातळीवर पंचनामे केले जात आहेत. तसेच अनेक लोकांच्या घरांची पडझड झाली आहे, अशा नागरिकांना देखील मदत मिळणार आहे. हे पैसे दिवाळीच्या पूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होतील. शासन म्हणून आम्ही शेतकऱ्यांच्या पाठीशी आहोत असा विश्वास एकनाथ शिंदेनी दिला. Eknath Shinde On Flood Affected Farmers
कर्जमाफी कधी करणार ?
दरम्यान राज्यात शेतकरी कर्जमाफीचा मुद्दा ही चांगलाच तापला आहे… महायुती सरकारने शेतकऱ्यांना दिलेलं कर्जमाफीचे आश्वासन पूर्ण करावे यासाठी विरोधकही आक्रमक झाले आहेत… त्यातच अतिवृष्टीमुळे कर्जमाफीचा मुद्दा आणखी धारदार झाला आहे… याविषयी एकनाथ शिंदे यांना विचारले असता ते म्हणाले, कर्जमाफीबाबत सरकार गंभीर आहे, परंतु याबाबत योग्य वेळी निर्णय घेतला जाईल. तसेच आम्ही केंद्र सरकारच्या संपर्कात आहोत. दोन्ही सरकारांकडून शेतकऱ्यांना मदत केली जाईल. शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही असे आश्वासन एकनाथ शिंदे यांनी दिले.





