Politics News : जयंत पाटलांचे सदाभाऊ खोतांना प्रत्युत्तर; म्हणाले, 10 पक्ष बदलणाऱ्यांनी…..

Published:
ज्यांनी आयुष्यात अनेक वेळा पक्ष बदलले, त्यांनी आम्हाला निष्ठेचे धडे देऊ नयेत. सतत भूमिका बदलणाऱ्या नेत्यांवर कोणताही पक्ष पूर्ण विश्वास ठेवत नाही. भाजपलाही हे चांगलेच ठाऊक आहे की हा माणूस कोणाचाच कायमचा नाही अशा शब्दात जयंत पाटील यांनी सदाभाऊ खोत यांच्यावर पलटवार केला.
Politics News : जयंत पाटलांचे सदाभाऊ खोतांना प्रत्युत्तर; म्हणाले, 10 पक्ष बदलणाऱ्यांनी…..

Politics News : राज्यातील राजकारण सध्या आरोप-प्रत्यारोपांनी तापलेले असताना सांगली जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) आणि महायुतीतील नेत्यांमध्ये शब्दयुद्ध रंगले आहे.  घड्याळाचे काटे उलटे फिरत असून जयंत पाटील लवकरच भाजपमध्ये येतील असा दावा सदाभाऊ खोत यांनी केला होता यावर आता जयंत पाटलांनी चोख प्रत्युत्तर देत ज्यांनी आयुष्यात अनेक वेळा पक्ष बदलले, त्यांनी आम्हाला निष्ठेचे धडे देऊ नयेत असे म्हटल आहे.

सदाभाऊ काय म्हणाले होते

काही दिवसांपूर्वी वाळवा येथील जाहीर सभेत बोलताना सदाभाऊ खोत यांनी जयंत पाटील यांच्यावर नाव न घेता निशाणा साधला होता. “राजकारणाचा काटा आता उलट दिशेने फिरतोय. फार दिवस ते तिकडे राहणार नाहीत. लवकरच ते भाजपमध्ये दिसतील,” असे सूचक विधान त्यांनी केले होते. तसेच, त्यांना भाजपमध्ये घ्यायचे की नाही, याचा निर्णय पक्षश्रेष्ठींनी घ्यावा, अशीही टिप्पणी खोत यांनी केली होती. या वक्तव्यामुळे जयंत पाटील यांच्या संभाव्य राजकीय भूमिकेबाबत चर्चांना उधाण आले होते. Politics News

जयंत पाटलांचा पलटवार (Politics News)

या टीकेवर प्रतिक्रिया देताना जयंत पाटील यांनी खोत यांच्यावर थेट पलटवार केला. “काही लोकांना प्रसिद्धीत राहण्यासाठी माझ्यावर टीका करावी लागते. जयंत पाटील यांच्याशिवाय त्यांची बातमीच तयार होत नाही, हे त्यांना माहीत आहे. त्यामुळे तथ्य नसलेली वक्तव्ये करणे हा त्यांचा नेहमीचा कार्यक्रम झाला आहे. ज्यांनी आयुष्यात अनेक वेळा पक्ष बदलले, त्यांनी आम्हाला निष्ठेचे धडे देऊ नयेत. सतत भूमिका बदलणाऱ्या नेत्यांवर कोणताही पक्ष पूर्ण विश्वास ठेवत नाही. भाजपलाही हे चांगलेच ठाऊक आहे की हा माणूस कोणाचाच कायमचा नाही अशा शब्दात जयंत पाटील यांनी सदाभाऊ खोत यांच्यावर पलटवार केला.