Jitendra Awhad Slam Sahar Shaikh : सहर शेख बालिश असून मुंब्र्याचा रंग तिरंगाच आहे. तुम्ही कुठल्याही एका रंगाची मोनोपॉली आणू शकत नाहीत असे म्हणत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते आणि आमदार जितेंद्र आव्हाड यांनी फटकारले आहे. तसेच हाथी चले अपनी चाल कुत्ते भोंके हजार, आपल्याला काही फरक पडत नाही”, अशी प्रतिक्रिया जितेंद्र आव्हाड यांनी दिली.
त्या वक्तव्याला खूप काही अर्थ नाही
मुंब्र्यात आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या नागरी सत्काराचे आयोजन करण्यात आले होते, या सोहळ्यापूर्वी मुंब्रातील रॅलीत आव्हाड यांनी सहर शेख प्रकरणावर भाष्य केलं. एखादी लहान पोरगी मिश्किलपणाने बोलते तर तिचं फार म्हणजे सोशल मीडियावरती तिच्या बालिशपणाची क्रेझ आहे, तिच्या त्या वक्तव्याला खूप काही अर्थ नाही. म्हणजे माझी लहान पोरगी हसत हसत म्हटली… चॉकलेट लाया.. तर तेही गाजेल त्यात काय विशेष नाही. मी अशा बालिशपणाला महत्त्व देत नाही असे जितेंद्र आव्हाड यांनी म्हटले. Jitendra Awhad Slam Sahar Shaikh
हे ही वाचा
मुंब्रा तिरंगा आहे (Jitendra Awhad Slam Sahar Shaikh)
जितेंद्र आव्हाड पुढे म्हणाले, आपला देश हा संविधानावर चालतो संविधान हा देशाचा आत्मा असून भारताचा रंग तिरंगा हा संपूर्ण देशाने स्वीकारला आहे. मुंब्रा तिरंगा आहे. हा देश तिरंगा आहे, हा महाराष्ट्र तिरंगा आहे. संविधानाने आपल्याला तिरंगा रंग दिलाय, तुम्ही कुठल्याही एका रंगाची मोनोपॉली या देशात आणू शकत नाही. हे राष्ट्र तिरंगी आहे. मुंब्रा काही देशाच्या बाहेर नाही असे जितेंद्र आव्हाड यांनी सांगितले.