Ladki Bahin Yojana : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या 2100 रुपयांच्या आश्वासनावरून विरोधक सरकारवर सातत्याने टीका करत आहेत. महायुती सरकारला एक वर्ष उलटून सुद्धा लाडक्या बहिणींना 1500 ऐवजी 2100 रुपये देण्याचे जे आश्वासन दिलेत आले होते ते अजूनही पूर्ण झालेलं नाही. सरकारने लाडक्या बहिणींना फसवलं आहे की काय अशी शंका या निमित्ताने सातत्याने उपस्थित केली जाते. सरकारमधील मंत्री सातत्याने आम्ही लवकरात लवकर लाडक्या बहिणीला 2100 रुपये देऊ असं सांगत असतात . मात्र अजूनही त्या दृष्टीने कोणतेही पाऊल सरकारकडून पडलेलं नाही. अशातच आता शिंदे गटाचे नेते आणि मंत्री उदय सामत यांनी 2100 रुपयांबाबत मोठं विधान केलं आहे.

काय म्हणाले उदय सामंत?? Ladki Bahin Yojana

मुंबईतील काल ठाकरे बंधूंच्या सभेत बोलताना मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी लाडक्या बहिणींना 2100 रुपये कधी मिळणार असा सवाल केला होता?? याबाबत उदय सामंत त्यांना विचारला असता ते म्हणाले की, लाडक्या बहिणींना 2100 रुपये देण्याबाबत आमचा अभ्यास सुरू आहे, योग्य वेळी तो निर्णय घेतला जाईल असं उदय सामंत यांनी म्हटलं आहे. कोणत्याही गैरसमजाला बळी पडू नका, असंही यावेळी उदय सामंत यांनी म्हटलं आहे, ते नांदेडमध्ये शिवसेना शिंदे गटाच्या प्रचारसभेत बोलत होते. Ladki Bahin Yojana

एकनाथ शिंदे काय म्हणाले होते??

खरंतर एकनाथ शिंदे यांनी 2024 च्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान लाडक्या बहिणींना आम्ही 1500 ऐवजी 2100 रुपये देऊन आश्वासन दिले होते . काही दिवसांपूर्वी एकनाथ शिंदे यांना याबाबत विचारलं असता आम्ही लवकरात लवकर लाडक्या बहिणींना 2100  रुपये देऊ… लाडकी बहीण योजना बंद होणार नाही असं मोघम उत्तर दिले होते.