Maharashtra Municipal Corporation Reservation 2026 : राज्यातील २९ महापालिकांच्या निवडणूक निकालानंतर आज महापौर पदासाठी आरक्षणाची सोडत जाहीर करण्यात आली. महापालिकांमधील सत्तासमीकरण ठरवणारी ही सोडत असल्याने संपूर्ण राज्याचे लक्ष याकडे लागले होते. नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्या उपस्थितीत ही प्रक्रिया पार पडली. या सोडतीसाठी विविध राजकीय पक्षांचे प्रमुख नेते उपस्थित होते. भाजपकडून महामंत्री राजेश शिरवडकर, ठाकरे गटाकडून मुंबई महानगरपालिकेच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर आणि आमदार मनोज जामसुतकर, तर राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) कडून आनंद परांजपे उपस्थित होते. महापौर पदाच्या आरक्षण सोडत म्हणजे केवळ पदांचे वर्गीकरण नाही, तर पुढील राजकीय लढतीची दिशा ठरवली आहे. ही सोडत म्हणजे अनेक पक्षांसाठी संधी, तर काहींसाठी मोठा धक्का ठरणार आहे.
कोणत्या शहरात कोणत्या जातीचा महापौर – Maharashtra Municipal Corporation Reservation 2026
1 बृहन्मुंबई (BMC) खुला प्रवर्ग (ओपन) (महिला)
2 ठाणे अनुसूचित जाती (एससी)
3 कल्याण-डोंबिवली अनुसूचित जमाती- एसटी (पुरुष)
4 नवी मुंबई खुला प्रवर्ग (ओपन)
5 वसई-विरार खुला प्रवर्ग (ओपन)
6 भिवंडी-निजामपूर
7 मीरा-भाईंदर खुला प्रवर्ग (ओपन)
8 उल्हासनगर ओबीसी
9 पुणे खुला प्रवर्ग (ओपन)
10 पिंपरी-चिंचवड खुला प्रवर्ग (ओपन)
11 नागपूर
12 अहिल्यानगर ओबीसी (महिला)
13 नाशिक खुला प्रवर्ग (ओपन)
14 छत्रपती संभाजीनगर खुला प्रवर्ग (ओपन)
15 अकोला ओबीसी (महिला)
16 अमरावती खुला प्रवर्ग (ओपन)
17 लातूर अनुसूचित जाती (एससी)
18 नांदेड-वाघाळा खुला प्रवर्ग (ओपन)
19 चंद्रपूर ओबीसी (महिला)
20 धुळे खुला प्रवर्ग (ओपन)
21 जळगाव ओबीसी (महिला)
22 मालेगाव खुला प्रवर्ग (ओपन)
23 कोल्हापूर ओबीसी
24 सांगली-मिरज-कुपवाड खुला प्रवर्ग (ओपन)
25 सोलापूर खुला प्रवर्ग (ओपन)
26 इचलकरंजी ओबीसी
27 जालना अनुसूचित जाती (एससी)
28 पनवेल ओबीसी
29 परभणी Maharashtra Municipal Corporation Reservation 2026
आरक्षणाचे एकूण वर्गीकरण
खुला प्रवर्ग – १७ महापालिका
अनुसूचित जाती (SC) – ३ महापालिका
अनुसूचित जमाती (ST) – १ महापालिका
इतर मागासवर्गीय (OBC) – ८ महापालिका






