17 सप्टेंबर हा दिवस ‘मराठवाडा मुक्ती संग्राम’ दिन म्हणून साजरा केला जातो. मराठवाड्याला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी अनेक क्रांतिकारकांनी आपल्या प्राणांचं बलिदान दिले. 17 सप्टेंबर 1948 रोजी मराठवाडा हा प्रदेश निजामांच्या तावडीतून मुक्त झाला होता. प्रदीर्घ काळ चाललेल्या लढाला यावेळी यश आले होते. याच मराठवाडा मुक्तिसंग्रामाबाबत सविस्तर जाणून घेऊ…
मराठवाडा मुक्तिसंग्रामाबद्दल…
17 सप्टेंबर 1948 या दिवशी मराठवाड्यातील निजामाची सत्ता संपली आणि हा भाग भारताचा एक बनला. 15 ऑगस्ट 1947 रोजी भारत स्वतंत्र झाला, पण त्यावेळी संपूर्ण देश विविध संस्थानांमध्ये विखुरलेला होता. त्यावेळच्या 565 पैकी 562 संस्थांनांनी स्वतंत्र भारतात सामाविष्ट होण्याची संमती दर्शविली आणि तशी कार्यवाही केली. मात्र, हैदराबाद, जुनागढ आणि जम्मू-काश्मिर ही तीन संस्थाने स्वतंत्र भारतात सामाविष्ट झाली नव्हती.
हे ही वाचा
निजामांच्या राज्यातून मुक्त होऊन भारतीय संघराज्यात सामाविष्ट होण्यासाठी स्वामी रामानंद तीर्थ यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण हैदराबाद संस्थानात मुक्ती संग्राम चालू झाला होता. निजामाने या लढ्याला तोंड देण्यासाठी अनेक मुस्लिमांची सैन्यात भरती केली, त्यांना रझाकार म्हणत. मुस्लिम स्वयंसेवकांची भरती केली आणि त्यांच्या साह्याने जनतेवर अमर्याद अत्त्याचार चालू केले. क्रांतिकारकांनी मोठ्या निकराने परिस्थितीशी झगडा केला. अखेर शेवटी 17 सप्टेंबर 1948 रोजी हैदराबादचे सैन्यप्रमुख जन अल इद्गीस यांनी शरणांगती स्वीकारली आणि निझाम पराभव मानले आणि हैदराबाद संस्थान भारतात विलीन झाले आणि हैदराबाद संस्थानात तिरंगा फडकला.
रक्तरंजित मुक्तिसंग्राम…
मराठवाड्याचा इतिहास अतिशय रक्तरंजित आहे. मराठवाड्यातील लोकांनी खूप मोठा संघर्ष केलेला आहे. मराठवाडा मुक्ती संग्रामात अनेक स्वातंत्र्य सैनिक सहभागी झाले होते. काहींनी आपल्या प्राणांची आहुती देखील दिली होती. 17 सप्टेंबर 1948 रोजी मराठवाडा हा प्रदेश निजामांच्या तावडीतून मुक्त झाला होता. त्या दिवसाची आठवण म्हणून 17 सप्टेंबर हा दिवस ‘मराठवाडा मुक्ती संग्राम’ दिन म्हणून साजरा केला जातो. म्हणूनच 17 सप्टेंबर हा दिवस अधिक महत्वाचा आहे.