”दुबार मतदान करायला गेल्यास रडूस्तर चोप देऊन….”, कासारीतील ‘त्या’ बॅनरने गोंधळ

Published:
अनेक मतदान केंद्रावर खळबळजनक प्रकार घडत आहेत. यामध्ये काही ठिकाणी पोस्टरबाजीसुद्धा दिसून येत आहेत.
”दुबार मतदान करायला गेल्यास रडूस्तर चोप देऊन….”, कासारीतील ‘त्या’ बॅनरने गोंधळ

News about the Kasari banner:  मुंबई, पुण्यासह आज महाराष्ट्रातील २९ महानगरपालिकांमध्ये मतदान होत आहे. सकाळपासूनच नागरिक आपल्या मतदानाचा हक्क बजावण्यासाठी मतदान केंद्रावर गर्दी करत आहेत. दरम्यान अनेक मतदान केंद्रावर खळबळजनक प्रकार घडत आहेत. यामध्ये काही ठिकाणी शाई पुसून पुन्हा मतदान करण्याचे प्रकारसुद्धा निदर्शनास येत आहेत.

दरम्यान याच मुद्द्याला लक्ष करत कासारी गावात काही अज्ञात लोकांनी मोठे पोस्टर लावत सर्वांचं लक्ष वेधलं आहे. यामध्ये एकदा मतदान केल्यानंतर पुन्हा शाई पुसून मतदान करायला येण्याबाबतचा मजकूर दिला आहे. पण हा मजकूर ज्या प्रकारात लिहिला आहे त्यामुळे सर्वांच्याच भुवय्या उंचावल्या आहेत.

काय आहे नेमका बॅनर-
”ग्रामस्थांनो दुबारा मतदान करायला वाघोलीमध्ये जाऊ नका, दुबार मतदान करायला गेल्यास रडूस्तर चोप देऊन पोलीस स्टेशनला पाठवण्यात येईल, पुणे महानगपालिका निवडणूक २०२६” अशा आशयाचा मजकूर कासारी गावात लावण्यात आला आहे. त्यामुळे चांगलीच खळबळ माजली आहे. या बॅनरवर कासारीतील ७ उमेदवारांची नावे वाघोली मतदार यादीत छापण्यात आली आहेत. त्या नावांचा उल्लेख या बॅनरवर करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार बॅनरवर नावे असणाऱ्या सातही मतदारांचा पुणे महानगरपालिकेशी किंवा वाघोलीशी काहीही संबंध नाही. हे सर्व कासारी गावातील एक सर्वसामान्य शेतकरी आहेत. त्यांच्यासोबत घडलेल्या या प्रकाराने सर्वांनीच नाराजी व्यक्त केली आहे.

यंदाच्या निवडणुकीत अनेक खळबळजनक प्रकार समोर येत आहेत. त्यामुळे नागरिकसुद्धा संभ्रमात पडले आहेत. कासारित घडलेल्या या बॅनरबाजीमुळे चांगलीच चर्चा रंगली आहे.

(टीप : वरील सर्व माहिती उपलब्ध स्त्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल MP मराठी Breaking कोणताही दावा करीत नाही.)

Aiman Jahangir Desai
लेखकाबद्दल
ऐमन जहागीर देसाई गेली 7 वर्षे पत्रकारितेत आहे. अडीच वर्षे न्यूज 18 लोकमत त्यानंतर दीड वर्षे हिंदुस्थान टाइम्स डिजिटलमध्ये काम केलं आहे. तिला मनोरंजन, लाइफस्टाइल, अध्यात्म या विषयांमध्ये रुची आहे. या विषयांच्या बातम्या करण्यात ती अधिक रमते. View all posts by Aiman Jahangir Desai
Follow Us :GoogleNews