Navi Mumbai Airport : नवी मुंबई विमानतळाला मोदींचे नाव? नव्या दाव्याने खळबळ

Published:
महाराष्ट्र विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांनी या विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव देण्याचा ठराव एकमताने मंजूर केला आहे. मात्र अनेक वर्ष उलटून सुद्धा  केंद्र सरकारने या प्रस्तावाला मंजुरी दिलेली नाही.
Navi Mumbai Airport : नवी मुंबई विमानतळाला मोदींचे नाव? नव्या दाव्याने खळबळ

Navi Mumbai Airport : एकीकडे मुंबई महापालिकेसह 29 महापालिकेच्या निवडणुका अवघ्या 4 दिवसांवर आली असताना आता काँग्रेसने भाजपावर नवी मुंबई विमानतळाच्या नावावरून गंभीर आरोप केला आहे. नवी मुंबई विमानतळाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नाव देण्याचा भाजपचा प्लान असल्याचा थेट आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला आहे. त्यांच्या या आरोपांनी मोठी खळबळ उडाली आहे.

नवी मुंबई विमानतळाचे नामांतर नेहमीच चर्चेत (Navi Mumbai Airport)

नवी मुंबई विमानतळाचे नाव आणि राजकीय श्रेयवाद यावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये वाद प्रतिवाद मागील अनेक दिवसांपासून पहायला मिळत आहे. महाराष्ट्र विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांनी या विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव देण्याचा ठराव एकमताने मंजूर केला आहे. मात्र अनेक वर्ष उलटून सुद्धा  केंद्र सरकारने या प्रस्तावाला मंजुरी दिलेली नाही. यावरून हर्षवर्धन सपकाळ यांनी भाजपवर निशाणा साधला. Navi Mumbai Airport

काय म्हणाले हर्षवर्धन सपकाळ??

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव द्यायचे नसून नरेंद्र मोदी यांचे नाव द्यायचे आहे, भाजपला हेच करायचे  आहे,  असा आरोप  हर्षवर्धन सपकाळ यांनी केला आहे. भाजपला केवळ मोदींचे नाव मोठे करायचे आहे अस सपकाळ म्हणाले. अकोट आणि परळीमध्ये भाजपा आणि शिवसेनेने एमआयएमशी युती केली आहे. तर, नव्या भाजपला मराठवाड्यातून भाजपाला काँग्रेस आणि भाजपमधील जुन्या, ज्येष्ठ लोकांची नावे पुसायची आहेत, असा हल्लाबोलही सपकाळ यांनी केला.