Marathi News

Parth Pawar : पार्थ पवारांवर नवी जबाबदारी!! राष्ट्रवादीत मोठ्या हालचाली

Published:
राज्यसभेच्या खासदार असलेल्या सुनेत्रा पवार यांनी खासदारकीचा राजीनामा देत उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्याने राज्यसभेतील त्यांची जागा रिक्त झाली आहे. या रिक्त जागेवर आता अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार यांची वर्णी लागण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे
Parth Pawar : पार्थ पवारांवर नवी जबाबदारी!! राष्ट्रवादीत मोठ्या हालचाली

Parth Pawar : राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात वेगाने घडामोडी घडत आहेत. त्यांच्या पश्चात पत्नी सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची जबाबदारी स्वीकारली असून, 31 जानेवारी रोजी त्यांचा शपथविधी पार पडला. राज्यसभेच्या खासदार असलेल्या सुनेत्रा पवार यांनी खासदारकीचा राजीनामा देत उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्याने राज्यसभेतील त्यांची जागा रिक्त झाली आहे. या रिक्त जागेवर आता अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार यांची वर्णी लागण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, पार्थ पवार यांचा राज्यसभेत प्रवेश करण्याचा मार्ग जवळपास मोकळा झाला आहे. Parth Pawar

दोन वर्षांची नव्हे, सहा वर्षांची टर्म?

सुनेत्रा पवार यांच्या राज्यसभेच्या कार्यकाळाला अजून दोन वर्षे बाकी होती. त्यांची मुदत 4 जुलै 2028 रोजी संपणार होती. मात्र, ही अपूर्ण टर्म स्वीकारण्याऐवजी पार्थ पवार यांना सहा वर्षांची पूर्ण टर्म असलेल्या राज्यसभेच्या जागेवर पाठवण्याचा विचार सुरू असल्याची माहिती आहे. लवकरच ही जागा भरली जाण्याची शक्यता असून, त्यासाठी पार्थ पवार यांनी राजकीय पातळीवर मोर्चेबांधणी सुरू केल्याचं समजतं.

पवार कुटुंबातील नवी जबाबदारी (Parth Pawar)

अजित पवार यांच्या निधनानंतर पार्थ पवार आणि जय पवार हे दोघेही राजकारणात अधिक सक्रिय होतील, असा अंदाज आधीपासूनच व्यक्त केला जात होता. यापूर्वी बारामतीमध्ये लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांच्या प्रचारात या दोघांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. मात्र आता परिस्थिती बदलली असून, दोघांच्या खांद्यावर मोठी जबाबदारी येऊन पडली आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार, एकीकडे सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्री म्हणून राज्यातील कारभार सांभाळतील, तर जय पवार हे दिल्लीत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रतिनिधित्व करतील, अशी भूमिका आखली जात आहे. यासंदर्भात पक्षांतर्गत बैठकीत पार्थ पवार यांनी वरिष्ठ नेत्यांशी चर्चा केल्याचीही माहिती आहे.

 

Asavari Khedekar Burumbadkar
लेखकाबद्दल
आसावरी ओंकार बुरुंबाडकर गेली 4 वर्ष पत्रकारितेत काम करत आहे. सध्या MP मराठी Breaking मध्ये डिजिटल कंटेट रायटर म्हणून कार्यरत आहे. आसावरीला मनोरंजन, अध्यात्म, लाईफस्टाईल अशा विविध विषयांमध्ये रुची आहे. यापूर्वी तिने एबीपी माझा, रत्नागिरी टाईम्स या मीडिया हाऊसमध्ये काम केलं आहे. डिजिटल माध्यमात काम करताना वृत्तपत्रांमध्ये विविध विषयावर लिखाण केलं आहे. डिजिटलमध्ये काम करताना ती वाचनाची आणि लिखाणाचीही आवड जपते. View all posts by Asavari Khedekar Burumbadkar
Follow Us :GoogleNews