एकनाथ खडसेंच्या घरातील चोरांचा शोध; 2 आरोपी पोलिसांच्या अटकेत, पण सीडी गायब ?

Written by:Rohit Shinde
Published:
काही दिवसांपूर्वी माजी मंत्री तथा विधानपरिषदेचे आमदार एकनाथ खडसे यांच्या जळगाव येथील घरात चोरी झाली. पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली आहे. तसेच चोरलेले मौल्यवान दागिने देखील पोलिसांना सापडले आहेत.
एकनाथ खडसेंच्या घरातील चोरांचा शोध; 2 आरोपी पोलिसांच्या अटकेत, पण सीडी गायब ?

काही दिवसांपूर्वी माजी मंत्री तथा विधानपरिषदेचे आमदार एकनाथ खडसे यांच्या जळगाव येथील घरात चोरी झाली. चोरांनी घरातील मौल्यवान वस्तू, पैसे आणि सीडी चोरल्या होत्या. या प्रकरणातील आरोपींना पकडण्यात पोलिसांना यश आले आहे. पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली आहे. तसेच चोरलेले मौल्यवान दागिने देखील पोलिसांना सापडले आहेत. खडसे यांच्या घरी झालेल्या चोरीप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे.

चोर सापडले, पण सीडी गायब?

या प्रकरणी पोलिसांनी दोन संशयित आरोपींना अटक केली आहे. पण ३ मुख्य आरोपी अद्याप फरार आहे. या आरोपींकडून चोरीचे सोने-चांदी दागिने जप्त करण्यात आले आहे. मात्र, खडसेंनी आरोप केलेले कागदपत्रं, सीडी आणि पेन ड्राईव्ह सापडले नसल्याचं समोर आलं आहे. जाज अहमद याच्याविरुद्ध वेगवेगळ्या राज्यांमध्ये तब्बल 25 ते 26 गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांनी दिली. खडसे यांच्या घरातून चोरी गेलेले सोने आणि चांदीचे दागिने पोलिसांनी जप्त केले आहेत. मात्र, कोणतीही कागदपत्रे, सीडी किंवा पेन ड्राईव्ह सापडलेली नाहीत. तसंच खडसे यांनी एफआयआरमध्ये अशा वस्तू चोरीला गेल्याचा उल्लेख केलेला नाही तसंच पुरवणी जबाब देखील दिलेला नसल्याचंही पोलीस अधीक्षक रेड्डी यांनी स्पष्ट केलं आहे.

फरार आरोपींचा शोध अद्याप सुरू

राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते तथा आमदार एकनाथ खडसे यांच्या जळगाव येथील घरात झालेल्या चोरीप्रकरणी पोलिसांनी दोन जणांना अटक केली आहे. अटक आरोपींमध्ये उल्हासनगर येथील चिराग सय्यद आणि कैलास खंडेलवाल या दोघांचा समावेश आहे. चोरांनी  खडसेंच्या घरात चोरी केली होती. चोरीनंतर आरोपींनी चोरलेला मुद्देमाल चिराग सय्यद याच्याकडे दिला होता, ज्याने तो पुढे कल्याण येथील  एका सराफ व्यवसाय करणाऱ्या कैलास खंडेलवालकडे विकला होता. मात्र, या घरफोडीतील मुख्य आरोपी एजाज अहमद, मोहम्मद बिलाल आणि बाबा हे अद्याप फरार असून त्यांचा शोध सुरू आहे.

Rohit Shinde
लेखकाबद्दल
रोहित शिंदे गेल्या 4 वर्षांपासून पत्रकारितेत सक्रिय आहे. टिव्ही तसेच डिजिटल माध्यमांमध्ये कामाचा चांगला अनुभव आहे. अनेक राजकीय तसेच सामाजिक विषयांवर त्याने सातत्याने लेखन केलं आहे. लोकांचे प्रश्न मांडण्यासाठी सदैव तत्पर असतो. View all posts by Rohit Shinde
Follow Us :GoogleNews