पोलिसांनी परवागी नाकारल्यानंतर देखील आंदोलनाचा अधिकार असल्याचा आक्रमक पवित्रा घेत ओबीसी नेते बाबासाहेब बटुळे आणि बाबासाहेब दखने हे अंतरवाली सराटीच्या सोनिया नगरमध्ये आमरण उपोषण करणार आहेत. त्यामुळे आंदोलनस्थळी पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. त्यामुळे मनोज जरांगे मुंबईत असताना आता ओबीसी समाज राज्यभरात एकवटताना दिसत आहे. एकंदरीत ही परिस्थिती आणखी बिघडण्याची शक्यता यामुळे निर्माण झाली आहे.

ओबीसी समाज आक्रमक

राज्यात पुन्हा एकदा आरक्षणावरुन राजकारण तापले आहे. एकीकडे मनोज जरांगे पाटील ओबीसीमधून मराठा समाजाला आरक्षण द्या अशी मागणी करत मुंबईतील आझाद मैदानात आंदोलन करत आहे. तर दुसरीकडे आता ओबीसी समाज देखील आरक्षणासाठी रस्त्यावर उतरला आहे. आज जरांगे पाटील यांच्या गावात आंदोलन करणार आहे. अंतरवाली सराटीत आज ओबीसी आंदोलक आंदोलन करणार आहेत मात्र आता या आंदोलनाला पोलिसांनी परवानगी नाकारली आहे.

अंतरवालीत वातावरण तापले!

मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण नको या मागणीसाठी आज जालन्यातील आंतरवाली सराटीमधील सोनिया नगरमध्ये ओबीसी नेते बाबासाहेब बटुळे आणि बाबासाहेब दखने हे आमरण उपोषण करणार आहे. मात्र या आंदोलनाला पोलिसांनी परवानगी नाकारली आहे. परवानगी नाकारल्यानंतर आम्हाला आंदोलनाचा अधिकार आहे असा आक्रमक पवित्रा घेत ओबीसी नेते बाबासाहेब बटुळे आणि बाबासाहेब दखने आंतरवाली सराटीमधील सोनिया नगरमध्ये आंदोलन करण्यास ठाम असल्याने परिसरात पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे.

ओबीसी कोट्यातून आरक्षण द्या -जरांगे

मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण  मिळावे, या मागणीसाठी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील पुन्हा एकदा मैदानात उतरले आहे. यावेळी त्यांनी स्पष्टपणे सांगितले आहे की, आगामी आंदोलन मुंबईतच  होणार आहे. हे आंदोलन निर्णायक ठरणार असून, मराठा समाजाच्या विजयाचा गुलाल उधळायचाच आहे, असा ठाम निर्धार त्यांनी व्यक्त केलाय. मुंबईतील हे आंदोलन आता फक्त मागणीचं नाही, तर निर्णय घेण्यासाठीचं असेल, असे देखील त्यांनी म्हटले आहे.