Politics News : महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या कोणत्या पक्षाची कोणासोबत आघाडी आहे? कोण कुठे कोणाशी युती करत आहे हेच कळेना. मागील आठवड्यात भाजपने काँग्रेस नगरसेवकांच्या साथीने अंबरनाथ मध्ये सत्ता स्थापन केले आणि शिंदे गटाला सत्तेच्या बाहेर टाकले. यानंतर बरेच राजकारण तापलं. दोन्ही पक्षांवर टीकांचा भडिमार सुरू झाला. त्यानंतर काँग्रेसच्या नगरसेवकांनी थेट भाजपमध्ये प्रवेश केला होता. मात्र आता एकनाथ शिंदे यांनी अंबरनाथ मध्ये मोठा डाव टाकत भाजपला सत्तेपासून दूर ठेवला आहे.

अंबरनाथ मध्ये नेमकं काय घडलं??Politics News:

अंबरनाथ नगरपालिकेत शिंदेंच्या शिवसेनेच्या मदतीने अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या सदाशिव पाटील उपनगराध्यक्ष बनवण्यात आलं आहे.  भाजपला सत्तेपासून दूर ठेवत शिंदेंच्या शिवसेनेनं  राजकीय गेम केला आहे.  श्रीकांत शिंदे यांच्या खेळीने त्यांनी भाजपाला धोबी पछाड दिला. अंबरनाथ नगरपालिकेत भाजपचे 32 आणि एकनाथ शिंदे गटाचे 28 नगरसेवक विजयी झाले आहेत. मात्र, उपनगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीतही भाजपा उमेदवाराचा पराभव झाला. Politics News

श्रीकांत शिंदे काय म्हणाले??

याबाबत श्रीकांत शिंदे म्हणाले, अंबरनाथ नगर परिषदेमध्ये बहुमतात असलो तरी सगळ्यांना सोबत घेऊन विकासाच्या दृष्टीने काम करणार आहोत. भाजपा आमच्यासोबत आली असती तर आनंद झाला असता, खर तर मला असे वाटले होते की भाजपच्या सोबत सत्ता स्थापन करेल.  भाजप प्रदेशाध्यक्षांसोबत माझं बोलणंही झालं होतं. मात्र, भाजपने भूमिका बदलली म्हणूनच आम्ही राष्ट्रवादीला पाठिंबा दिला अशी माहिती श्रीकांत शिंदे यांनी दिली.