Politics News : भाजपकडून ठाकरेंना युतीची ऑफर?? राजकारणात खळबळ

Published:
भाजपच्या या ऑफरनंतर ठाकरे गटाकडून   उपमहापौरपद आणि स्थायी समितीच्या अध्यक्ष पदाची मागणी करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे
Politics News : भाजपकडून ठाकरेंना युतीची ऑफर?? राजकारणात खळबळ

Politics News : राज्यात भाजप आणि उद्धव ठाकरे हे एकमेकांचे कट्टर विरोधक म्हणून ओळखले जातात. मुंबई महापालिका निवडणुकीत सुद्धा भाजप आणि ठाकरे आमने-सामने आले. उद्धव ठाकरे सातत्याने भाजपच्या बड्या नेत्यांवर तोफ डागत असतात तर दुसरीकडे भाजपकडूनही ठाकरेंना जशास तसे उत्तर सातत्याने देण्यात येते.  मात्र अकोला महापालिकेत मात्र भाजपने थेट उद्धव ठाकरेंना युतीची ऑफर दिल्याची चर्चा सुरू झाली आहे. ठाकरेंनी ही ऑफर स्वीकारली तर राज्याच्या राजकारणात नवीन संकेत मिळू शकतात.

कशी आहेत राजकीय समीकरणे

अकोला महापालिकेच्या निवडणुकीत कोणत्याही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळालेले नाही. त्या ठिकाणी भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. अकोला महापालिकेत नगरसेवकांची सदस्य संख्या 80 असून बहुमतासाठी 41 चा आकडा गाठावा लागतो. याठिकाणी भाजपचे 38 नगरसेवक विजयी झाले आहेत तर उद्धव ठाकरे गटाकडे सहा नगरसेवक आहे. त्यामुळे या दोन्ही पक्षांची युती होऊ शकते. त्याच पार्श्वभूमीवर भाजपने शिवसेना ठाकरे गटाला युतीची ऑफर दिली आहे. Politics News

ठाकरे गट काय करणार? politics News 

भाजपच्या या ऑफरनंतर ठाकरे गटाकडून   उपमहापौरपद आणि स्थायी समितीच्या अध्यक्ष पदाची मागणी करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. ठाकरे गटाच्या या मागणीवर भाजप चर्चा करणार आहे. अकोला महापालिकेत युती करण्याबाबत भाजप आणि ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्यांमध्ये गुप्त बैठक झाल्याचेही बोलले जात आहे.

Asavari Khedekar Burumbadkar
लेखकाबद्दल
आसावरी ओंकार बुरुंबाडकर गेली 4 वर्ष पत्रकारितेत काम करत आहे. सध्या MP मराठी Breaking मध्ये डिजिटल कंटेट रायटर म्हणून कार्यरत आहे. आसावरीला मनोरंजन, अध्यात्म, लाईफस्टाईल अशा विविध विषयांमध्ये रुची आहे. यापूर्वी तिने एबीपी माझा, रत्नागिरी टाईम्स या मीडिया हाऊसमध्ये काम केलं आहे. डिजिटल माध्यमात काम करताना वृत्तपत्रांमध्ये विविध विषयावर लिखाण केलं आहे. डिजिटलमध्ये काम करताना ती वाचनाची आणि लिखाणाचीही आवड जपते. View all posts by Asavari Khedekar Burumbadkar
Follow Us :GoogleNews