Politics News : राष्ट्रवादी काँग्रेसचा राष्ट्रीय अध्यक्ष हा पाटील असावा, परंतु पटेल नसावा अस म्हणत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी परखडपणे राष्ट्रवादी काँग्रेस मधील एकूण परिस्थितीवर भाष्य केलं होते. राज ठाकरे यांचा रोख हा प्रफुल पटेल यांच्यावर होता हे स्पष्ट होते. आता राज ठाकरेंच्या त्या ट्विट वर प्रफुल पटेल यांनी सडेतोड प्रत्युत्तर दिले आहे. माझ्या पक्षाचा विधिमंडळ नेता आणि राष्ट्रीय अध्यक्ष कोण असावा, हे राज ठाकरे किंवा सकाळी नऊ वाजताचं बुलेटिन (संजय राऊत) हे ठरवणार का?, असा सवाल पटेल यांनी केला.
काय म्हणाले प्रफुल पटेल? Politics News
राज ठाकरे, वाकरे… ते माझ्या पक्षाशी संबंधित आहेत का, ते आमच्या पक्षात आहेत का? माझ्या पक्षाचा विधिमंडळ नेता आणि राष्ट्रीय अध्यक्ष कोण असावा, हे राज ठाकरे किंवा सकाळी नऊ वाजताचं बुलेटिन (संजय राऊत) हे ठरवणार का?, असा प्रतिसवाल प्रफुल पटेल यांनी उपस्थित केला. आम्ही आमच्या पक्षात काय करावं, हे ते सांगत आहेत. अजित पवार यांच्यानंतर पक्षाचा नवा नेता निवडण्याची जबाबदारी कार्याध्यक्ष म्हणून माझ्यावर आहे. आम्ही योग्य निर्णय घेण्याच्या प्रक्रियेत आहोत. आम्ही सध्या विधिमंडळ नेता आणि उपमुख्यमंत्र्याची निवड केली आहे. आता आमचा पक्ष सेटल झाल्यावर आम्ही दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाच्या विषयाकडे लक्ष देऊ, असे प्रफुल पटेल यांनी सांगितले. Politics News
राज ठाकरे नेमकं काय म्हणाले होते
महाराष्ट्राच्या राजकारणाचा गेल्या काही काळात पार विचका झाला आहे. त्यावर खरंतर भाष्य पण करावं असं वाटत नाही. पण तरीही आज दिवसभर ज्या घडामोडी सुरु आहेत त्यावर बोलावंच लागेल. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासारख्या अस्सल मराठमोळ्या मातीतला, आणि रांगड्या पक्षाचा अध्यक्ष हा कोणीही मराठी असावा, पाटील असावा पण पटेल नाही !’ असे ट्विट राज ठाकरे यांनी केले होते.





