Politics News : जर देवाच्या मनात असेल तर मुंबई महानगरपालिकेत आमचा महापौर बसेल असं विधान कालच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केल्यानंतर राजकीय वर्तुळात मोठे खळबळ उडाली होती. देवा भाऊ म्हणजे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना उद्देशूनच ठाकरेंनी हे विधान केलं नाही ना ?अशाही चर्चा त्यानंतर रंगताना दिसल्या. आता तर उद्धव ठाकरे यांचे अत्यंत विश्वासू आणि ठाकरे गटाची बुलंद तोफ म्हणून ओळखले जाणाऱ्या खासदार संजय राऊत यांनी ट्विट करत देवेंद्र फडणवीस यांचे कौतुक केलं आहे. त्यामुळे ठाकरेंच्या मनात नेमकं चाललय तरी काय?? अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.
काय आहे संजय राऊत यांचे ट्विट?? Politics News
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दावोस दौऱ्यासाठी रवाना झाले आहेत. त्या ठिकाणी विमानतळावरच त्यांचे जंगी स्वागत झाल्याचं पाहायला मिळाले. हाच फोटो शेअर करत संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीस यांचे कौतुक केलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे परदेशात जसे स्वागत होते अगदी तसे स्वागत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे झुरिच येथे करण्यात आले ही मराठी माणसाला सुखावणारी गोष्ट आहे. महापालिका निवडणुकीत भरघोस यश प्राप्त केल्यानंतर फडणवीस यांचा प्रवास दिल्लीतील सर्वोच्च पदासाठी सुरू झालेला दिसतोय असं ट्विट करत संजय राऊत त्यांनी खळबळ उडवून दिली. Politics News
राऊत – फडणवीस कट्टर विरोधक
असं बघितलं तर संजय राऊत आणि देवेंद्र फडणवीस हे राजकारणातील कट्टर विरोधक म्हणून ओळखले जातात. संजय राऊत रोजच्या पत्रकार परिषदेत देवेंद्र फडणीस यांच्यावर चौफेर हल्ला चढवताना उभा महाराष्ट्र बघतो. मुंबई महापालिका निवडणुकीच्या प्रचारातही संजय राऊत यांच्या निशाण्यावर देवेंद्र फडणवीस होते. मात्र आता महापालिकेची गणिते बदलल्यानंतर संजय राऊत यांनी फडणवीस यांचे कौतुक केल्याने राजकीय चर्चांना उधाण आल आहे. एकीकडे एकनाथ शिंदे यांनी आपल्या 29 विजयी नगरसेवकांना हॉटेलमध्ये ठेवल आहे, तर दुसरीकडे उद्धव ठाकरेंनी देवाच्या मनात असेल तर मुंबईत आपला महापौर बसू शकतो असं म्हटलं आहे. आता संजय राऊत यांनी चक्क फडणीसांचं कौतुक केल्याने मुंबईत ठाकरे आणि फडणवीस एकत्र येणार का?? या चर्चांना जोर आलाय.






