Marathi News

Politics News : उद्धव ठाकरेंनी मनसे ताब्यात घेतला!! गंभीर आरोप करत संतोष धुरी यांचा जय महाराष्ट्र

Published:
उद्धव ठाकरे यांनी मनसे हा पक्ष ताब्यात घेतलाय. राज ठाकरेंनी उद्धव ठाकरे समोर सरेंडर केल आहे असा गंभीर आरोप करत संतोष धुरी यांनी मनसेला जय महाराष्ट्र केला आहे.
Politics News : उद्धव ठाकरेंनी मनसे ताब्यात घेतला!! गंभीर आरोप करत संतोष धुरी यांचा जय महाराष्ट्र

Politics News : मुंबई महापालिका निवडणूक अवघ्या दहा दिवसांवर आली असताना मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना मोठा धक्का बसला आहे.  उद्धव ठाकरे यांनी मनसे हा पक्ष ताब्यात घेतलाय. राज ठाकरेंनी उद्धव ठाकरे समोर सरेंडर केल आहे असा गंभीर आरोप करत संतोष धुरी यांनी मनसेला जय महाराष्ट्र केला आहे. संतोष धुरी यांनी आज भाजपमध्ये लागलीच प्रवेश सुद्धा केला. संतोष धुरी हे मनसेचे महत्त्वाचे नेते असलेल्या संदीप देशपांडे यांचे निकटवर्तीय मानले जातात त्यामुळे संतोष तुरी यांनी पक्ष सोडणे मनसेसाठी अडचणीचे ठरू शकते.

धुरी यांची नाराजी कशासाठी? Politics News

ठाकरे बंधूंच्या जागा वाटपात मराठी माणसाच्या हक्काची मते असलेल्या दादरमधील वॉर्ड क्रमांक 190 आणि वॉर्ड क्रमांक 192 शिवसेना ठाकरे गटाला सुटला. साहजिकच मनसे कडून इच्छुक असलेल्या संतोष धुरी यांचा पत्ता आपोआप कट झाला. यामुळे संतोष धुरी मागील काही दिवसांपासून नाराज असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. अखेर आज त्यांनी भाजपमध्ये प्रवेश करत राज ठाकरेंना मोठा धक्का दिला. Politics News

ठाकरे बंधूंवर आरोप

भाजपचा गमच्या गळ्यात घालतात संतोष धुरी यांनी ठाकरे बंधूंवर सडकून टीका केली.  राज ठाकरे साहेबांनी हिरवं रक्त असलेल्या लोकांशी युती केली आहे. उद्धव ठाकरेंनी मनसेचा पूर्णपणे ताबा घेतला आहे. राज ठाकरे यांनी आमचा पक्ष उद्धव ठाकरे यांच्यासमोर पूर्णपणे सरेंडर केला आहे. असा आरोप संतोष धुरी यांनी केला. एवढेच नव्हे तर मुंबईत मनसेला 52 जागा सोडल्याचे दिस आहेत. मात्र, त्यापैकी सात किंवा आठ सीट निवडून येईल की नाही, याचीही शाश्वती नाही. उद्धव ठाकरे गटाने आम्हाला पाहिजे त्या सीट दिल्या नाहीत. उलट ज्या जागांवर ठाकरे गटाकडे उमेदवारच नव्हते किंवा ज्याठिकाणी त्यांच्या विद्यमान नगरसेवकाचे नाव खराब झाले होते, अशा जागा ठाकरे गटाने मनसेला देऊ केल्या असेही त्यांनी म्हटले.

Asavari Khedekar Burumbadkar
लेखकाबद्दल
आसावरी ओंकार बुरुंबाडकर गेली 4 वर्ष पत्रकारितेत काम करत आहे. सध्या MP मराठी Breaking मध्ये डिजिटल कंटेट रायटर म्हणून कार्यरत आहे. आसावरीला मनोरंजन, अध्यात्म, लाईफस्टाईल अशा विविध विषयांमध्ये रुची आहे. यापूर्वी तिने एबीपी माझा, रत्नागिरी टाईम्स या मीडिया हाऊसमध्ये काम केलं आहे. डिजिटल माध्यमात काम करताना वृत्तपत्रांमध्ये विविध विषयावर लिखाण केलं आहे. डिजिटलमध्ये काम करताना ती वाचनाची आणि लिखाणाचीही आवड जपते. View all posts by Asavari Khedekar Burumbadkar
Follow Us :GoogleNews