Politics News : राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनाने महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. कामाचा झपाटा, निर्णयक्षमता आणि थेट कारभारासाठी ओळखले जाणारे अजित पवार हे शेवटच्या क्षणापर्यंत सक्रिय राजकारणात होते. त्यांच्या जाण्याने केवळ पवार कुटुंबावरच नव्हे, तर संपूर्ण महाराष्ट्रावर शोककळा पसरली आहे. मात्र शोकाच्या वातावरणातच आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या भवितव्याबाबत आणि नेतृत्वाबाबत चर्चा सुरू झाल्या आहेत. अजित पवारांनंतर पक्षाची धुरा कोण सांभाळणार, हा प्रश्न ऐरणीवर आला असून, त्यातच राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार नरहरी झिरवाळ यांनी थेट भूमिका मांडत राजकीय वर्तुळात खळबळ उडवली आहे.
सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्री व्हाव्यात? Politics News
अजित पवारांवर आज बारामतीत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना नरहरी झिरवाळ यांनी सुनेत्रा पवार यांना सत्तेत सक्रिय भूमिका द्यावी, अशी स्पष्ट भूमिका मांडली. सुनेत्रा पवार यांना मंत्रिमंडळात समाविष्ट करावे, ही केवळ बारामतीची नाही तर संपूर्ण महाराष्ट्रातील कार्यकर्त्यांची भावना असल्याचे झिरवाळ यांनी सांगितले. “अजित पवारांचा राजकीय वारसा पुढे नेण्याची क्षमता सुनेत्रा वहिनींमध्ये आहे. राष्ट्रवादी काँग्रेसची धुरा आता त्यांनीच सांभाळावी, अशी सर्वसाधारण भावना आहे,” असे मत झिरवाळ यांनी व्यक्त केले. त्यांच्या या वक्तव्यामुळे अजित पवारांच्या उत्तराधिकारीपदाची चर्चा अधिक तीव्र झाली आहे. Politics News
तुतारी–घड्याळ एकत्र?
दरम्यान, झिरवाळ यांनी यावेळी आणखी एक महत्त्वाचा संकेत दिला. दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस आता एकत्र येण्याची गरज आहे, असे स्पष्ट मत त्यांनी मांडले. तुतारी आणि घड्याळ वेगवेगळे ठेवून चालणार नाही, एकत्र राहणं हीच काळाची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. या वक्तव्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणाच्या चर्चांना पुन्हा वेग आला आहे. अजित पवारांच्या निधनानंतर पक्षाची सूत्रे कोणाच्या हाती जाणार, उपमुख्यमंत्रीपदाचा निर्णय कोण घेणार आणि राष्ट्रवादी काँग्रेसची पुढील दिशा काय असेल, याकडे आता संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.






