Politics News : राजकीय विश्वातून एक मोठी घडामोडी समोर येत आहे. जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणूक आता पुढे ढकलण्यात आली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आलेला आहे. यापूर्वी या निवडणुकीसाठीचे मतदान हे 5 फेब्रुवारी 2026 रोजी होणार होते. मात्र आता यामध्ये बदल करत 7 तारखेला मतदान प्रक्रिया पार पडणार आहे.
अजित पवारांच्या निधनामुळे दुःखाचा डोंगर Politics News
अजित पवार यांचे 28 जानेवारी 2026 रोजी अपघाती निधन झालं आहे. या निधनामुळे संपूर्ण महाराष्ट्रावर दुःखाचा डोंगर कोसळला असून राज्य शासनाने राज्यात 28 जानेवारी 2026 ते 30 जानेवारी 2026 पर्यंत दुखवटा जाहीर केला आहे. या कालावधीचा विचार करून जिल्हा परिषदा व पंचायत समित्यांच्या निवडणुकांच्या कार्यक्रमातील उर्वरित टप्प्यांमध्ये बदल करण्यात आले आहेत. आता 7 फेब्रुवारी रोजी मतदान आणि 9 फेब्रुवारी रोजी निकाल जाहीर होतील. Politics News
हे ही वाचा
कधी जाहीर झाला होता निवडणूक कार्यक्रम
राज्य निवडणूक आयोगाने या निवडणुकांसाठी 13 जानेवारी 2026 रोजी सविस्तर निवडणूक कार्यक्रम जाहीर केला होता. त्या कार्यक्रमानुसार नामनिर्देशनपत्र दाखल करणे, नामनिर्देशनपत्र मागे घेणे, निवडणूक चिन्ह वाटप तसेच अंतिम उमेदवारांची यादी प्रसिद्ध करण्याची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. मात्र मतदान, मतमोजणी आणि निवडून आलेल्या सदस्यांची नावे राजपत्रात प्रसिद्ध करणे हे टप्पे अद्याप शिल्लक होते.