अजितदादा कोणत्या रूपात अडकले? चाकणकरांच्या राजीनाम्यावरून प्रकाश महाजन आक्रमक

Published:
रुपाली चाकणकरांनी त्या मृत महिलेचे चारित्र्यहनन केलं आहे. एवढं होऊनही रुपाली चाकणकर महिला आयोगाच्या अध्यक्षपदी कशा? अजित पवार कोणत्या रुपात अडकलेत? 
अजितदादा कोणत्या रूपात अडकले? चाकणकरांच्या राजीनाम्यावरून प्रकाश महाजन आक्रमक

फलटण महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणावरून महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर विरोधकांच्या निशाणावर आहेत. रूपाली चाकणकर यांनी मृत डॉक्टर महिलेचे चॅट समोर आणल्याने चाकणकर यांनी महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी विरोधकांकडून केली जात आहे. शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी या प्रकरणात आक्रमक भूमिका मांडली असताना आता मनसेचे नेते प्रकाश महाजन यांनी रूपाली चाकणकरांच्या मुद्द्यावरून थेट अजित पवारांवर निशाणा साधला आहे.

काय म्हणाले प्रकाश महाजन?

प्रसार माध्यमांशी बोलताना प्रकाश महाजन म्हणाले, रुपाली चाकणकरांनी त्या मृत महिलेचे चारित्र्यहनन केलं आहे. डॉक्टर बीड जिल्ह्यातील असल्याने आमचे भावनात्मक नाते आहे. एवढं होऊनही रुपाली चाकणकर महिला आयोगाच्या अध्यक्षपदी कशा? अजित पवार कोणत्या रुपात अडकलेत? असा असा सवाल प्रकाश महाजन यांनी केला. मुख्यमंत्री फडणवीस हे रणजीतसिंह निंबाळकर यांना कशी काय क्लीनचीट देऊ शकतात?? असाही प्रश्न महाजन यांनी उपस्थित केला.

जयकुमार गोरेंवर टीकास्त्र

यावेळी प्रकाश महाजन यांनी भाजप नेते आणि ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्यावर सुद्धा टीकास्त्र सोडले. जयकुमार गोरे यांनीही मृत महिलेच्या चॅटिंगवर भाष्य करत तिचे चारित्र्यहनन करण्याचा प्रयत्न केला.जयकुमार गोरे यांचं लोकांनी काय काय दाखवलं नाही? ज्या महिलेला एक कोटी रुपये देताना ट्रॅप करण्यात आलं ते एक कोटी गोरेंकडे कसे आले हे ईडीने त्यांना विचारलं का?? असे म्हणत जयकुमार गोरे यांच्या दृष्टीने स्त्री जर फक्त उपभोगाची वस्तू आहे. हे कोणीही मूळ भाजपचे नाहीत, ते बाहेरून आले आहेत, त्यांनी बाहेरून येताना हा रोग आणला अशी टीका प्रकाश महाजन यांनी केली.

Asavari Khedekar Burumbadkar
लेखकाबद्दल
आसावरी ओंकार बुरुंबाडकर गेली 4 वर्ष पत्रकारितेत काम करत आहे. सध्या MP मराठी Breaking मध्ये डिजिटल कंटेट रायटर म्हणून कार्यरत आहे. आसावरीला मनोरंजन, अध्यात्म, लाईफस्टाईल अशा विविध विषयांमध्ये रुची आहे. यापूर्वी तिने एबीपी माझा, रत्नागिरी टाईम्स या मीडिया हाऊसमध्ये काम केलं आहे. डिजिटल माध्यमात काम करताना वृत्तपत्रांमध्ये विविध विषयावर लिखाण केलं आहे. डिजिटलमध्ये काम करताना ती वाचनाची आणि लिखाणाचीही आवड जपते. View all posts by Asavari Khedekar Burumbadkar
Follow Us :GoogleNews