Marathi News

Pune Election Exit Poll : पुण्यात काका – पुतण्यावर भाजप भारी!! Exit Poll नुसार एकहाती सत्ता

Published:
एक्झिट पोल नुसार पुण्यात भाजपाला 93 जागांचे स्पष्ट बहुमत मिळत आहे. तर अजित पवार आणि शरद पवार यांची सत्ता पुन्हा एकदा जाताना दिसत आहे. मनसेला पुण्यात भोपळाही फोडता आलेला नाही.
Pune Election Exit Poll : पुण्यात काका – पुतण्यावर भाजप भारी!! Exit Poll नुसार एकहाती सत्ता

Pune Election Exit Poll : एक्झिट पोल नुसार मुंबई महापालिका निवडणुकीत ठाकरे बंधूंना धक्का बसत असल्याचे चित्र असताना दुसरीकडे पुण्यातही भाजप समोर पवार काका पुतणे गारद होताना दिसत आहेत. एक्झिट पोल नुसार पुण्यात भाजपाला 93 जागांचे स्पष्ट बहुमत मिळत आहे. तर अजित पवार आणि शरद पवार यांची सत्ता पुन्हा एकदा जाताना दिसत आहे. मनसेला पुण्यात भोपळाही फोडता आलेला नाही. तर शिंदेंची शिवसेना आणि ठाकरेंची शिवसेना या दोन्ही शिवसेनेचाही पुण्यात सुपर साफ होताना दिसतोय.

काय सांगतो पुण्याचा एक्झिट पोल (Pune Election Exit Poll)

पॉलिटिकल ब्युरो अँड अॅनालिसिस ब्युरो म्हणजेच प्राब संस्थेच्या एक्झिट पोलनुसार, पुण्यात भाजपला 93 जागा मिळतील.  अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला 43, तर शरद पवार यांच्या राष्ट्रवादीला 8 जागा मिळण्याचा अंदाज आहे. शिंदेंच्या शिवसेनेला 6 आणि ठाकरेंच्या शिवसेनेला 7 जागा पुण्यात मिळतील असे एक्झिट पोल मध्ये दिसत आहे. या एक्झिट पोलनुसार काँग्रेसला 8 जागा मिळण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे तर मनसेला पुण्यात खातं देखील उघडता आलेलं नाहीये, तर अपक्ष दोन ते तीन ठिकाणी विजयी होण्याचा अंदाज आहे.

पुणे महापालिका अंदाज

भाजप – 91
राष्ट्रवादी अजित पवार – 43
राष्ट्रवादी शरद पवार -8
शिवसेना ठाकरे – 7
शिवसेना शिंदे – 6
काँग्रेस  – 8

Asavari Khedekar Burumbadkar
लेखकाबद्दल
आसावरी ओंकार बुरुंबाडकर गेली 4 वर्ष पत्रकारितेत काम करत आहे. सध्या MP मराठी Breaking मध्ये डिजिटल कंटेट रायटर म्हणून कार्यरत आहे. आसावरीला मनोरंजन, अध्यात्म, लाईफस्टाईल अशा विविध विषयांमध्ये रुची आहे. यापूर्वी तिने एबीपी माझा, रत्नागिरी टाईम्स या मीडिया हाऊसमध्ये काम केलं आहे. डिजिटल माध्यमात काम करताना वृत्तपत्रांमध्ये विविध विषयावर लिखाण केलं आहे. डिजिटलमध्ये काम करताना ती वाचनाची आणि लिखाणाचीही आवड जपते. View all posts by Asavari Khedekar Burumbadkar
Follow Us :GoogleNews