Raj Thackeray : 20 वर्षांनी राज ठाकरे शिवसेना भवनात; मनसेसाठी भावनिक क्षण

Published:
राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे या ठाकरे बंधूंकडून आज मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वचननामा जाहीर करण्यात आला. तब्बल वीस वर्षांनी राज ठाकरे शिवसेना भवनात गेल्याने शिवसेना आणि मनसे या दोन्ही कार्यकर्त्यासाठी हा अत्यंत भावनिक असा क्षण पाहायला मिळाला.
Raj Thackeray : 20 वर्षांनी राज ठाकरे शिवसेना भवनात; मनसेसाठी भावनिक क्षण

Raj Thackeray : मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज तब्बल वीस वर्षांनी शिवसेना भावना पोहोचले. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे या ठाकरे बंधूंकडून आज मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वचननामा जाहीर करण्यात आला. तब्बल वीस वर्षांनी राज ठाकरे शिवसेना भवनात गेल्याने शिवसेना आणि मनसे या दोन्ही कार्यकर्त्यासाठी हा अत्यंत भावनिक असा क्षण पाहायला मिळाला.

उद्धव ठाकरेंनी केलं राज ठाकरेंचे स्वागत ( Raj Thackeray)

उद्धव ठाकरेंनी पुष्पगुच्छ देऊन राज ठाकरे यांचे शिवसेना भवनात स्वागत केले. यावेळी खासदार संजय राऊत यांनी आपल्या भाषेत उल्लेख केला की राज ठाकरे आज वीस वर्षांनी शिवसेना भवनात आलेत पत्रकारांनी विचारलं कसं वाटले. खरं तर आज खऱ्या अर्थाने  संपूर्ण महाराष्ट्राला बरं वाटतंय. Raj Thackeray

जेलमधून सुटून आल्यासारखं वाटतं

संजय राऊत यांच्यापासून नंतर राज ठाकरेंनी हातात माईक घेतला. माझे मित्र संजय राऊत यांनी वारंवार 20 वर्षानंतर आले असा वारंवार उल्लेख केला. मला वाटतं जेलमधून सुटून आल्यासारखं वाटतं असं म्हणत राज ठाकरेंनी संजय राऊत यांची फिरकी घेतली. आज मी खूप वर्षाने सेनाभवनात आलो. नवीन सेना भवन पहिल्यांदाच बघतो. माझ्या कायमच्या आठवणी या जुन्या शिवसेना भवनाच्या आहेत त्यामुळे इथे कुठे काय आहे मला काहीच कळेना अस राज ठाकरे म्हणाले.