राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार संजय खोडके यांचा भीषण अपघात झाला आहे. महापालिका निवडणुकीच्या तयारीच्या पार्श्वभूमीवर ते अमरावती शहरात कार्यकर्त्यांच्या बैठकीला जात असताना त्यांच्या दुचाकीला कारने उडवले. या अपघातात संजय घोडके यांच्या पायाला आणि मणक्याला मार मार लागल्याची समोर येत आहे. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आला असून डॉक्टरांच्या देखरेखी खाली उपचार सुरू आहेत.
नेमकं काय घडलं? Sanjay Khodke Accident
याबाबत अधिक माहिती अशी की, संजय खोडके हे अजित पवार गटाचे विधान परिषदेचे आमदार आहेत. आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आयोजित करण्यात आलेल्या कार्यकर्त्याच्या बैठकीला ते आपल्या दुचाकीवरून जात होते. याचदरम्यान, त्यावेळी रस्त्यावर अचानक एक कार समोर आली आणि तिने संजय खोडके यांच्या गाडीला जोरदार धडक दिली. या अपघातात संजय खोडके जखमी झाले. त्यांच्या पायाला आणि मणक्याला जबर मार लागला. उपचारासाठी त्यांना रीम्स हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे. Sanjay Khodke Accident
खोडके यांची प्रतिक्रिया
आज मी दुपारी ३ वाजता माझ्या दुचाकीने जात असतांना अपघात झाला आहे. सध्या माझ्यावर एका खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. डॉक्टरांनी सर्व तपासण्या केल्या असून, रिपोर्ट सुद्धा नॉर्मल आहेत. मी सुखरूप आहे. काळजी करण्याचे कारण नाही. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार एक दिवस निगरानीमध्ये रुग्णालयात राहावं लागणार आहे. कार्यकर्त्यांनी माझ्या प्रकृतीची चिंता करू नये, माझी प्रकृती ठीक आहे. उद्या अमरावतीत होऊ घातलेला राष्ट्रवादी काँग्रेसचा मेळावा यशस्वी करावा’ असं देखील आवाहन संजय घोडके यांनी केलं आहे





