Sanjay Raut : मुंबई महापालिका निवडणुकीच्या निकालानंतर मोठ्या राजकीय घडामोडी बघायला मिळत आहेत. महापौर निवडी आधीच हॉटेल पॉलिटिक्स सुरू झाल असून एकनाथ शिंदे यांनी आपल्या 29 विजयी नगरसेवकांना वांद्रे येथील हॉटेल ताज लँड्स मध्ये मुक्कामी ठेवल आहे. एकनाथ शिंदे यांना आपले नगरसेवक फुटण्याची भीती तर वाटत नाही ना ?? अशा चर्चा यानंतर सुरू झाल्या. त्यातच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी कालच देवाच्या मनात असेल तर आपला महापौर बसू शकतो असे विधान केलं होतं. आता खासदार संजय राऊत यांच्या एका विधानाने शिंदे गटात गोळा येण्याची शक्यता आहे.
ताज लँड्समध्ये आज आम्ही जेवायला जाणार (Sanjay Raut)
संजय राऊत यांनी आज सकाळ सकाळीच प्रसार माध्यमांशी संवाद साधला. यावेळी एकनाथ शिंदे यांच्या नगरसेवकांना हॉटेलमध्ये ठेवण्यात आले आहे याबाबत विचारला असता ते म्हणाले, देवेंद्र फडणीस यांनी विकासासाठी त्या हॉटेलमध्ये 29 नगरसेवकांची सुटका करावी. त्या नगरसेवकांना मोकळं सोडा त्यांना मोकळा श्वास घेऊ द्या.. नाहीतर आमच्या घरातील माणसे बेपत्ता झाली अशी तक्रार त्यांची नातेवाई करू शकतात. नाहीतर आज आम्ही ताज लँड्स मध्ये जेवायला चाललो आहोत. उगीच तुम्ही आमच्यावर संशय घ्यायचे अस म्हणत संजय राऊतानी बॉम्ब टाकला. Sanjay Raut
शिंदेंकडून महापौर पदावर दावा
दरम्यान, सूत्रांच्या माहितीनुसार एकनाथ शिंदे यांनी पहिल्या अडीच वर्षासाठी भाजपकडे मुंबई महापालिकेचे महापौर पद मागणार असल्याचे बोलले जात आहे. यंदाचे वर्ष बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दीचे वर्ष आहे. त्यामुळे बाळासाहेबांची ही इच्छा पूर्ण करा आणि शिवसेनेला अडीच वर्ष महापौरपद द्या, अशी भावनिक साद एकनाथ शिंदे भाजपकडे करण्याची चर्चा सुरू झाली आहे. मात्र कोणत्याही परिस्थितीत भाजप एकनाथ शिंदे यांची ही मागणी पूर्ण करण्याची शक्यता नाही. कारण मागील अनेक वर्षांपासून मुंबई महापालिकेत आपलाच महापौर बसवायचा यासाठी भाजपने चंग बांधला होता. त्यासाठीची तयारी केली होती आणि भाजपाला सर्वाधिक नगरसेवक सुद्धा निवडून आणण्यात यश मिळाले. अशावेळी शिंदेंचा महापौर मुंबईत बसवला तर भाजप ही निवडणूक हरल्यासारखं होईल.






