Exit Poll जाहीर होताच राऊतांचं खळबळजनक ट्विट; त्या बैठकीत नेमकं काय ठरलं?

Published:
देवेंद्र फडणवीस यांचा मुंबईतील खास खजिनदार, लाडका बिल्डर आणि गगराणी यांच्या बैठकीत काय शिजले? असा प्रश्न त्यांनी विचारला आहे.
Exit Poll जाहीर होताच राऊतांचं खळबळजनक ट्विट; त्या बैठकीत नेमकं काय ठरलं?

मुंबई महानगरपालिकेच्या एक्झिट पोल मध्ये ठाकरे बंधूंना मोठा झटका बसताना दिसतोय. एकीकडे महायुती 125 ते 130 जागांवर विजयी होऊ शकते असा अंदाज एक्झिट पोल मध्ये वर्तवण्यात आलाय तर दुसरीकडे ठाकरे बंधू आणि शरद पवारांना अवघ्या 70 ते 80 जागा मिळताना दिसत आहेत. या एक्झिट पोल मुळे उद्धव ठाकरेंच्या 25 वर्षाच्या सत्तेला सुरुंग लागल्याचे स्पष्ट झालं असताना दुसरीकडे ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी एक ट्विट करत खळबळ उडवून दिली आहे.

काय आहे संजय राऊतांचे ट्विट

संजय राऊत यांनी ट्विट करत म्हटले, आताची ताजी खबर, मुंबई पालिका आयुष्य भूषण गगराणी यांची भाजपासोबत प्रदीर्घ चर्चा आणि बैठक संपली. देवेंद्र फडणवीस यांचा मुंबईतील खास खजिनदार, लाडका बिल्डर आणि गगराणी यांच्या बैठकीत काय शिजले? असा प्रश्न त्यांनी विचारला आहे. संजय राऊतांच्या या ट्विटमुळे राजकीय वर्तुळात तर्क वितर्क लढवले जात आहे. राऊतांच्या या ट्विटचा रोख मोहित कंबोज यांच्या दिशेने असल्याचं बोलले जाते.

मुंबईतील एक्झिट पोल काय सांगतोय?

JVC BMC Exit Poll : BMC Election 2026 Exit Poll
भाजप शिंदे – 138
ठाकरे- मनसे – 59
काँग्रेस-वंचित – 23
इतर – 7

मतांची टक्केवारी किती?
महायुती : 42-45%
शिवसेना ठाकरे- मनसे : 34-37%
काँग्रेस- वंचित : 13-15%
इतर : 6-8% (BMC Election 2026 Exit Poll)

Lokshahi Rudra Research BMC Exit Poll :

भाजप शिवसेना – 121
शिवसेना ठाकरे- मनसे – 71
काँग्रेस वंचित – 25
इतर – 10

Axis My India BMC Exit Poll :

भाजप शिंदे – 131- 151
ठाकरे- मनसे – 58-68
काँग्रेस-वंचित – 12-16
इतर – 6-12

मतदानाची टक्केवारी कशी?

भाजप शिंदे – 42
ठाकरे- मनसे – 32
काँग्रेस-वंचित – 13
इतर – 13

Asavari Khedekar Burumbadkar
लेखकाबद्दल
आसावरी ओंकार बुरुंबाडकर गेली 4 वर्ष पत्रकारितेत काम करत आहे. सध्या MP मराठी Breaking मध्ये डिजिटल कंटेट रायटर म्हणून कार्यरत आहे. आसावरीला मनोरंजन, अध्यात्म, लाईफस्टाईल अशा विविध विषयांमध्ये रुची आहे. यापूर्वी तिने एबीपी माझा, रत्नागिरी टाईम्स या मीडिया हाऊसमध्ये काम केलं आहे. डिजिटल माध्यमात काम करताना वृत्तपत्रांमध्ये विविध विषयावर लिखाण केलं आहे. डिजिटलमध्ये काम करताना ती वाचनाची आणि लिखाणाचीही आवड जपते. View all posts by Asavari Khedekar Burumbadkar
Follow Us :GoogleNews