मुंबई: महापालिका निवडणुकीच्या तोंडावर आता राज्यातील राजकीय घडामोडींना भलताच वेग आला आहे. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे ठाकरे बंधू लवकरच एकत्रित येण्याची शक्यता वर्तवली जात होती. दोन्ही बाजूकडीला नेत्यांकडूनही तसे दावे केले जात होते. पण आता या प्रकरणात आता आणखी एक ट्विस्ट आला आहे. तो ट्विस्ट असा की राज ठाकरेंची मनसे आणि शिंदेंच्या शिवसेनेच्या युतीचा शक्यता. त्यात आता शिंदेच्या शिवसेनेच्या एका बड्या मंत्र्यांने राज ठाकरेंनी खुली ऑफरच दिली आहे. त्यामुळे आता अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
संजय शिरसाटांची खुली ऑफर
शिंदे गटाने राज ठाकरेंना युतीची ऑफर दिल्याने महाराष्ट्रातील राजकारणात नवीन वळण आले आहे. मुख्यमंत्री फडणवीस आणि राज ठाकरे यांच्या भेटीनंतर ही ऑफर दिली गेली. यामुळे मनसे कोणत्या गटासोबत जाईल का? याबाबत तर्कवितर्क रंगले आहेत. उद्धव ठाकरे गटाला टोला लगावत शिरसाट यांनी राज ठाकरेंना शिंदे गटासोबत युती करण्याचे आवाहन केले आहे.
” राज ठाकरे यांना यापूर्वीही आम्ही ऑफर दिली होती. आजही आमची राज ठाकरे यांना आमची सोबत येण्यासाठी ऑफर आहे. राज ठाकरे हे चांगल्या पद्धतीने महानगरपालिकेची निवडणूक लढू शकतात. त्यांनी आमच्या सोबत यायला पाहिजे, ” असं संजय शिरसाट यानी म्हटलं आहे.
राज ठाकरे नेमके कुणासोबत?
मुंबई महापालिकेच्या निवडणुका अजून चार महिन्यावर आहेत. मात्र, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुंबईतील एका हॉटेलात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्याने या घडामोडींना अधिकच वेग आला आहे. त्यामुळे मनसे महायुतीत जाण्याची चर्चा रंगली आहे. मात्र, यावर भाजप आणि मनसेकडून कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही. या चर्चा सुरू असतानाच शिंदे गटाचे नेते आणि राज्याचे सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी थेट राज ठाकरेंना शिंदे गटासोबत युती करण्याची ऑफर दिली आहे. त्यामुळे राज ठाकरे हे भाजपसोबत जाणार, शिंदे गटासोबत जाणार की उद्धव ठाकरे गटासोबत जाणार? याची चर्चा रंगली आहे.





