Satara News : महाराज साहेब, तिकीट द्या, नाहीतर फास लावायला दोरी द्या

Published:
महाराज साहेब... आता उमेदवारी द्या नाहीतर दोरी द्या फास घ्यायला इथंच" अशी मिश्कील टिप्पणी  उदयनराजे भोसले यांच्यासोबत बोलत असताना कुलदीप क्षीरसागर यांनी केली.
Satara News : महाराज साहेब, तिकीट द्या, नाहीतर फास लावायला दोरी द्या

Satara News : राज्यातील 12 जिल्हा परिषद आणि 125 पंचायत समित्यांच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला असून यामध्ये सातारा जिल्ह्याचाही समावेश आहे. सातारा जिल्हा परिषद आणि 11 तालुक्यातील पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना चांगलाच वेग आला असून अनेक जण तयारीला लागली आहेत. याच पार्श्वभूमीवर एका उमेदवाराने चक्क भाजप नेते आणि खासदार उदयनराजे भोसले यांच्याकडे उमेदवारीची साद घालत महाराज साहेब तिकीट द्या नाहीतर फास्ट लावायला दोरी तरी द्या अशी मागणी केली. कार्यकर्त्याच्या या अनोख्या मागणीने उदयनराजांना हसू आवरता आलं नाही.

कोणी मागितले तिकीट (Satara News)

आम्ही ज्या उमेदवाराबद्दल बोलतोय त्यांचं नाव आहे कुलदीप क्षीरसागर…. कुलदीप क्षीरसागर हे छत्रपती उदयनराजे भोसले यांचे खंदे समर्थक असून ते मसूर जिल्हापरिषद गटामधून जिल्हा परिषदेसाठी इच्छुक उमेदवार आहेत. उदयनराजेंच्या प्रचाराची धुरा कुलदीप यांनी अनेकदा अतिशय समर्थपणे सांभाळली आहे.  यांच्या आधी विधानसभेच्या निवडणुकीवेळी कराड उत्तर विधानसभा मतदारसंघातून कुलदीप शिरसागर हे विधानसभेसाठी उमेदवार म्हणून इच्छुक होते.परंतु उदयनराजे भोसले यांच्या शब्दाला मान देऊन त्यांनी उमेदवारी मागे घेतली होती. आता जिल्हा परिषद निवडणुकीसाठी मात्र त्यांनी पुन्हा एकदा आपली इच्छा बोलून दाखवली. Satara News

उदयनराजेंना हसू आवरलं नाही

जलमंदिर पॅलेस येथे उदयनराजे भोसलेंची भेट घेत असताना कुलदीप क्षीरसागर यांनी आपल्या खास शैलीत ही मागणी केली. महाराज साहेब… आता उमेदवारी द्या नाहीतर दोरी द्या फास घ्यायला इथंच” अशी मिश्कील टिप्पणी  उदयनराजे भोसले यांच्यासोबत बोलत असताना कुलदीप क्षीरसागर यांनी केली. कुलदीप क्षीरसागर यांच्या या बोलण्यावर उदयनराजे भोसले यांनाही हसू आवरले नाही.  निष्ठेची आणि जुन्या त्यागाची आठवण करून देत क्षीरसागर यांनी केलेल्या या विधानाची सध्या सातारा जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात मोठी चर्चा रंगली आहे.