Sharad Pawar Ajit Pawar : पिंपरी चिंचवड आणि पुणे महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट आणि अजित पवार गट एकत्र आले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीनंतर मागील काही वर्षांपासून दुरावा आलेल्या काका पुतण्यांनी पुण्यात पुन्हा एकदा आपली सत्ता आणण्यासाठी अनपेक्षितपणे आघाडी केली आणि सत्ताधारी भाजप समोर नव आव्हान उभं केलं. त्यातच मागील काही दिवसांपासून असेही चर्चा सुरू आहेत की शरद पवार लवकरच एनडीए मध्ये सामील होतील. अशावेळी जर दोन्ही काका पुतणे एकत्र भाजपसोबत आले तर काय होईल ?? असा प्रश्न मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विचारण्यात आला असता त्यावर फडणवीस यांनी दिलेलं उत्तर चर्चेत आलं आहे..
काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत देवेंद्र फडणवीस म्हणाले की, सध्या तरी राष्ट्रवादी शरद पवार आणि अजित पवार या दोन्ही गटांची आघाडी ही स्थानिक पातळीवर आहे असे आम्ही समजतो. शरद पवार आणि अजित पवार यांच्यात झालेली आघाडी ही फक्त दोन शहरांपुरती मर्यादित आहे. इतर ठिकाणी ते एकमेकांच्या विरोधात निवडणुका लढवत आहेत. राहिला प्रश्न भविष्याचा तर विष्यात काय होईल याबद्दल मी बोलणे सोडून दिले आहे. महाराष्ट्रात जे-जे घडलं, ते माझ्यासाठी अनाकलनीय होते. एक काळ असा होता, जेव्हा मी ठामपणे म्हणायचो की हे होणार नाही आणि तेच झालेलं मी राजकारणात बघितले आहे. पण सध्यातरी मला तशी परिस्थिती दिसत नाही,” असे देवेंद्र फडणवीस म्हणाले. Sharad Pawar Ajit Pawar
अजित पवारांकडून एकत्रीकरणाचे संकेत (Sharad Pawar Ajit Pawar)
दरम्यान काल पुण्यातील एका जाहीर सभेत अजित पवार यांनी दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या एकत्रिकरणाचे स्पष्ट संकेत दिले. झालं गेलं गंगेला मिळालं आता आपल्याला एकोप्यांना काम करायचं आहे शरद पवार साहेबांचे नेतृत्व हे दूरदृष्टीचे नेतृत्व आहे. काकाच्या पुण्याईनेच माझं सगळं काही बरं चाललंय असं म्हणत अजित पवारांनी एकप्रकारे कार्यकर्त्यांना एकजुटीने काम करण्याचा संदेश दिला.





