केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा देणाऱ्या शिक्षकांना निवडणूक कर्तव्यातून सूट

Published:
केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा (CTET) देणाऱ्या शिक्षकांना जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणूक कर्तव्यातून सूट देण्यात आली आहे. या संदर्भात राज्य निवडणूक आयोगाने राज्यातील सर्व संबंधित जिल्हाधिकाऱ्यांना स्पष्ट निर्देश जारी केले आहेत.

7 फेब्रुवारीला मतदान

राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनामुळे राज्यात तीन दिवसांचा शासकीय दुखवटा जाहीर करण्यात आला होता. त्या पार्श्वभूमीवर 12 जिल्हा परिषद आणि त्याअंतर्गत येणाऱ्या 125 पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांच्या मतदानाच्या तारखेत बदल करण्यात आला आहे. यानुसार, पूर्वी 5 फेब्रुवारी 2026 रोजी होणारे मतदान आता 7 फेब्रुवारी 2026 रोजी पार पडणार आहे.

शिक्षकांना दिलासा

दरम्यान, याच कालावधीत राज्यातील काही शिक्षकांची केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा (CTET) नियोजित असल्याने, संबंधित शिक्षकांना निवडणूक कर्तव्यावर नियुक्त न करता त्यांना सूट देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. तसेच, या शिक्षकांच्या ऐवजी पर्यायी कर्मचाऱ्यांची व्यवस्था करण्याबाबतही जिल्हाधिकाऱ्यांना सूचना करण्यात आल्या आहेत. या निर्णयामुळे परीक्षा देणाऱ्या शिक्षकांना दिलासा मिळाला असून, निवडणूक प्रक्रिया आणि परीक्षा दोन्ही सुरळीत पार पडण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

Asavari Khedekar Burumbadkar
लेखकाबद्दल
आसावरी ओंकार बुरुंबाडकर गेली 4 वर्ष पत्रकारितेत काम करत आहे. सध्या MP मराठी Breaking मध्ये डिजिटल कंटेट रायटर म्हणून कार्यरत आहे. आसावरीला मनोरंजन, अध्यात्म, लाईफस्टाईल अशा विविध विषयांमध्ये रुची आहे. यापूर्वी तिने एबीपी माझा, रत्नागिरी टाईम्स या मीडिया हाऊसमध्ये काम केलं आहे. डिजिटल माध्यमात काम करताना वृत्तपत्रांमध्ये विविध विषयावर लिखाण केलं आहे. डिजिटलमध्ये काम करताना ती वाचनाची आणि लिखाणाचीही आवड जपते. View all posts by Asavari Khedekar Burumbadkar
Follow Us :GoogleNews