पावसाळी अधिवेशनातून महाराष्ट्राच्या जनतेला भोपळा मिळाला, विरोधकांचे सत्ताधाऱ्यांच्या विरोधात आंदोलन

Written by:Astha Sutar
Published:
Last Updated:
महायुती सरकारने राज्यातील जनतेला अनेक आश्वासन देऊन मत मिळवली. महायुती सरकारला सत्तेत येऊन आठ महिने झाले तरीही सरकारने आपले आश्वासन पूर्ण केले नाही.
पावसाळी अधिवेशनातून महाराष्ट्राच्या जनतेला भोपळा मिळाला, विरोधकांचे सत्ताधाऱ्यांच्या विरोधात आंदोलन

Mansoon Session – पावसाळी अधिवेशनाचे शुक्रवारी सूप वाजणार आहे. गेल्या दोन आठवड्यापासून हे अधिवेशन सुरु आहे. आज गुरुवारच्या दिवशी विरोधकांनी सत्ताधाऱ्यांच्या विरोधात जोरदार आंदोलन केले. पावसाळी अधिवेशनातून महाराष्ट्राच्या जनतेला काय मिळाले? आदिवासी समाजाला भोपळा, शेतकरी कर्जमाफी भोपळा, आरोग्य विभागाला भोपळा… अशी घोषणाबाजी करत विरोधकांनी सत्ताधाऱ्यांच्या विरोधात विधान भवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांनी आंदोलन केले.

सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी…

दरम्यान, विधानसभा निवडणूक दरम्यान महायुती सरकारने राज्यातील जनतेला अनेक आश्वासन देऊन मत मिळवली. महायुती सरकारला सत्तेत येऊन आठ महिने झाले तरीही सरकारने आपले आश्वासन पूर्ण केले नाही. तसेच विधिमंडळ पावसाळी अधिवेशनातून महाराष्ट्राच्या जनतेला काहीच मिळाले नसल्याने आज विधान भवनाच्या पायऱ्यांवर महाविकास आघाडीच्या आमदारांनी जोरदार घोषणाबाजी करत याविरोधात आंदोलन केले.

सर्वांच्या हाती भोपळा…

विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनातून महाराष्ट्राच्या जनतेला काय मिळाले? भोपळा मिळाला आहे. विद्यार्थ्यांना शिक्षकांना आशा वर्कर, गिरणी कामगार यांना भोपळा मिळाला आहे. विरोधकांनी महाविकास आघाडीच्या आमदारांनी हातात भोपळा घेऊन विधान भवनाच्या पायऱ्यांवर आंदोलन केले. शेतकरी कर्जमाफी भोपळा… पिक विमा योजना भोपळा… लाडकी बहीण योजना भोपळा….. आदिवासी समाजाला भोपळा… आरोग्य विभागाला भोपळा… शिक्षण विभागाला भोपळा…. अशी घोषणाबाजी केली.