कल्याण-डोंबिवलीत मनसेच्या 2 माजी नगरसेवकांचा शिवसेनेत प्रवेश, हे सरकार विकासाला चालना देणारे – एकनाथ शिंदे

Written by:Astha Sutar
Last Updated:
महायुतीचा विकासाचा अजेंडा आहे. येत्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये महायुतीचा विजय होईल, असा विश्वास उपमुख्यमंत्री शिंदे यांनी व्यक्त केला.
कल्याण-डोंबिवलीत मनसेच्या 2 माजी नगरसेवकांचा शिवसेनेत प्रवेश, हे सरकार विकासाला चालना देणारे – एकनाथ शिंदे

 

Eknath Shinde – कल्याण डोंबिवली महापालिकेचे मनसेचे माजी नगरसेवक राजन मराठे, माजी नगरसेविका ज्योती मराठे यांनी शिवसेना प्रवेश केला. संसदीय पक्षाचे नेते व कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास दाखवत आज शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. यासह ठाणे महापालिकेचे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे माजी नगरसेवक बाबाजी पाटील यांनीही शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेचा धनुष्यबाण हाती घेतले.

एमएमआरमध्ये विकासाला चालना…

दरम्यान, मागील अडीच वर्षात मुख्यमंत्री असताना एमएमआरमध्ये विकासाला चालना दिली. या कामांमुळे प्रभावित होऊन लोकप्रतिनिधी शिवसेनेत प्रवेश करत आहेत, असे ते म्हणाले. महायुतीचा विकासाचा अजेंडा आहे. येत्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये महायुतीचा विजय होईल, असा विश्वास उपमुख्यमंत्री शिंदे यांनी व्यक्त केला. खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी कल्याण लोकसभा मतदार संघात अनेक लोकाभिमुख कामे केली आहेत. कल्याण डोंबिवली महापालिका आणि ठाणे महापालिका या दोन्ही महापालिकांमध्ये मागील अनेक वर्षांमध्ये विकासाची कामे झाली. असे उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले.

विरोधक दिशाभूल करताहेत…

दुसरीकडे लाडकी बहीण योजना ही महिलांच्या सक्षमीकरणाची दिशा आहे. मात्र विरोधक दिशाभूल करत असले तरी महिलांचा आत्मसन्मान अधिक मजबूत करण्यासाठी शासन कटिबद्ध असल्याचे उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी सांगितले. दुसरीकडे आज कल्याण डोंबिवली महापालिकेतील मनसेचे माजी नगरसेवक राजन मराठे, माजी नगरसेविका ज्योती मराठे, उपशहर अध्यक्ष किशोर कोशिंबकर, सुरेश मराठे, रविंद्र बोबडे, संजय तावडे, केतन खानविलकर, सुधीर थोरात यांच्यासह शेकडो पदाधिकाऱ्यांनी आज शिवसेनेत प्रवेश केला.

Astha Sutar
लेखकाबद्दल
Follow Us :GoogleNews